नागपूर : वीजतारांच्या स्पर्शाने अकरा वर्षीय मुलगा भाजला

बोर्डा गावातील घटना; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Nagpur touch of electric wire Eleven year old boy burnt
Nagpur touch of electric wire Eleven year old boy burntsakal
Updated on

वरोरा : बारीक ताराने पतंग उडवित असतानाच २२० केव्ही वीजतारांचा स्पर्श झाला. त्यात एक अकरा वर्षीय मुलगा भाजला. ही घटना शुक्रवारी (ता. २८) वरोरा शहरानजीकच्या बोर्डा गावात घडली. तारांचा स्पर्श होताच मोठा स्फोट झाल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. भाजल्या गेलेल्या मुलाचे नाव आदित्य उमेश येरे असे आहे. त्याला उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Nagpur touch of electric wire Eleven year old boy burnt
मुलगी मालमत्ता नव्हे जिला दान करता येईल; मुंबई HC ने वडिलांना सुनावले

शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या मार्गालगत उमेश येरे यांचे घर आहे. त्यांचा मुलगा आदित्य हा शुक्रवारी घरावर चढून पतंग उडवित होता. याच परिसरातून वरोरा ते चंद्रपूरकडे जाणारी २२० केव्ही विद्युत वाहिनी गेली आहे. आदित्य पतंग बारीक ताराने उडवीत होता. बारीक तारांचा उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाल्याने मोठा स्फोट झाला व उच्च विद्युत वाहिनी बंद पडली. त्यात आदित्य हा ८० टक्के भाजला गेला. त्याला तातडीने उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

Nagpur touch of electric wire Eleven year old boy burnt
अजितदादांचे मोदी सरकारला पत्र! केंद्राकडे थकला 28 हजार कोटींचा 'जीएसटी'

आदित्यला शॉक लागल्यानंतर तो विद्युत प्रवाह घरात गेला. त्यांच्या घरातील पूर्ण वायरिंग, वीज मीटर आणि सर्विस वायर व बाजूच्या घरचे मीटरही जळाले. घटनास्थळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनोद कुमार भोयर, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद पोतराजे, वीज वितरण कंपनीचे शहर सहायक अभियंता एस. बी. चुका यांनी भेट देऊन पाहणी करीत बारीक तार असलेला बंडल ताब्यात घेतला.

''बारीक तार लावून पतंग उडत असताना उच्च दाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात बारीक तार आला. त्यामुळे हा अपघात झाला. घटनास्थळावरून वितळलेले बारीक तारांची तुकडे जमा करण्यात आले.''

- विनोद पोतराजे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महापारेषण वरोरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.