आता प्राध्यापक शिकवणार व्हिडिओद्वारे, विद्यापीठाने अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला डोमेनवर

nagpur university
nagpur university
Updated on

नागपूर  : देशभरात लॉकडाऊन असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला नसल्याने ते चिंतेत आहेत. या बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी विद्यापीठाने शक्‍कल लढविली. विद्यापीठातील विविध विभाग आणि  महाविद्यालयातील 700 प्राध्यापकांद्वारे विविध विषयांचे लेक्‍चर देणारे 900 व्हीडिओ, प्रेझेंटेशन https://rtmnu-eshiksha.in या डोमेनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना सेमिस्टरनुसार ऑनलाइन शिकविण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातल्या सर्वच विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्यात. या सूचनांचे पालन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्राध्यापकांना विषयनिहाय सेमिस्टरमधील अभ्यासक्रमाच्या आधारावर घेण्यात येणाऱ्या लेक्‍चर्सचे व्हीडिओ तयार करण्याचे आदेश दिलेत. जवळपास चाळीस ते पन्नास प्राध्यापकांनी सहभागी होऊन व्हीडिओ तयार केले आहेत. हे व्हीडिओ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील असून त्यात विज्ञान, वाणिज्यसह तांत्रिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात पावरपॉईन्ट प्रेझेंटेशनचाही समावेश आहे. व्हीडिओ आणि शैक्षणिक साहित्य विद्यापीठाच्या https://rtmnu-eshiksha.in डोमेनवर उपलब्ध आहेत. याशिवाय अनुदान आयोगाच्या 12 विविध लिंकसह इतर महत्वाच्या लिंकही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जवळपास 21 एप्रिलपासूनच या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. विद्यार्थी त्यांच्या डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा मोबाइल फोनचा वापर करून विविध अभ्यासक्रम आणि विषयांशी संबंधित या सामग्रीचा लाभ घेऊ शकतात.

पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर लाइव्ह लेक्‍चर्स, वेबिनार इत्यादींच्या घोषणांसाठी एक विभाग आहे. विद्यापीठात 40 पदव्युत्तर विभाग, तीन संचालित महाविद्यालये आणि 400 पेक्षा अधिक संलग्नित महाविद्यालयात तीन लाखाहुन अधिक विद्यार्थी शिकतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.