Nagpur University: माजी कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे निधन!

Nagpur Latest Upadate: विशेष म्हणजे १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस, फार्मसी काँग्रेस, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
Nagpur University: माजी कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे निधन!
Updated on

Latest Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर किंगसवें रुग्णालयात उपचार सुरू होता.

डॉ. चौधरी यांनी ८ ऑगस्ट २०२० मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर सातत्याने ते वादग्रस्त ठरले होते. त्यातून गेल्यावर्षी त्यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून चौकशी लावण्यात आली होती. त्यातून राज्यपालांनी त्यांना निलंबित केले होते. दरम्यान याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दिलासा मिळवित पुन्हा कुलगुरूपद मिळविले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.