Nagpur: तक्रार मागे घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी,तक्रारदारांविरोधात अधिसभा सदस्य आक्रमक; विद्यापीठातील धवनकर प्रकरण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास अंतिम टप्प्यात आहे.
Nagpur News
Nagpur News Marathi
Updated on

Nagpur University Financial Fraud Case : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास अंतिम टप्प्यात आहे. तरीही सातपैकी चार तक्रारकर्त्यांनी माघार घेतली आहे.

ज्यांनी धवनकर यांना पैसे दिल्याचे मान्य केले होते, त्यांनीच माघार घेतल्याने अशा प्राध्यापकांविरोधात कारवाई करा अशी मागणी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी आणि विष्णू चांगदे यांनी केली. विशेष असे की, तक्रारीमुळे विद्यापीठाची बदनामी झाली. अचानक अशी माघार घेणे संयुक्तिक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अधिसभेच्या बैठकीत ॲड. वाजपेयी यांनी या प्रकरणातील कारवाईबाबत विचारणा केली. यावेळी उपकुलसचिव मदने यांनी माहिती दिली. या प्रकरणात निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत २० सभा झाल्या आहेत. मात्र, अंतिम निकालापर्यंत जाता आले नाही. (Latest Marathi News)

धवनकर यांचे वकील प्रत्येक तारखेला एक नवीन अर्ज लावून माहिती मागतात आणि वेळ मारून नेतात. त्यामुळे हे प्रकरण लांबल्याचे सांगितले. तसेच तक्रार देणाऱ्या चौघांनी चक्क माघार घेतली आहे. आमची एकमेकांशी तडजोड झाली असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले. यावर वाजपेयी आणि चांगदे यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर विद्यापीठ कारवाई करीत आहेत.

Nagpur News
Arvind Kejriwal Health : अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली; शुगर लेव्हल 46 ने घसरली

दीड वर्षांपासून सक्तीच्या रजेवर असलेल्या धवनकर यांना वेतन दिले जात आहे. प्राध्यापकांच्या तक्रारीमुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आले असून विद्यापीठाची बदनामी झाली. असे असताना जर आता कुणी तक्रार मागे घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी यावेळी केली.(Latest Marathi News)

प्रत्येक तक्रारीनंतर धवनकर सुटले

डॉ. धवनकर यांच्यावर यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली आहे. पाकिस्तान सहलीच्या नावावर त्यांनी विद्यार्थ्यांचे पैसे घेतल्याचा प्रकारही सर्वश्रुत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली सहल प्रकरणातही अशीच तक्रार होती. मात्र, काही महिने निलंबित किंवा सक्तीच्या रजेवर असणाऱ्या धवनकरांवर कधीही गंभीर कारवाई झाली नाही. उलट त्यांनाच यश आले, असा आरोप विष्णू चांगदे यांनी केला. प्राध्यापकांच्या तक्रार प्रकरणातही काही गंभीर होताना दिसत नाही. त्यामुळे यावेळी तरी कठोर कारवाई व्हावी. तसेच पैसे परत केले म्हणजे झाले असे होत नसून तक्रार मागे घेणाऱ्यांचीही चौकशी करावी असेही चांगदे म्हणाले.

Nagpur News
Sangli Loksabha Election 2024 : सांगलीतल्या पाटीलकीवर काँग्रेस ठाम! ठाकरे गटासोबत मैत्रीपूर्ण लढत? दिल्लीत खलबतं सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.