नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी अन् उन्हाळी परीक्षांची तारीख ठरली, लवकरच वेळापत्रक जाहीर

Set exam
Set exam e sakal
Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा एक महिना स्थगित करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले. यामध्ये विद्यापीठातील २१ हिवाळी परीक्षांचा समावेश होता. मात्र, आता या परीक्षा मे महिन्यातच घेण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रथम आणि तिसऱ्या वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Set exam
उपराजधानी हादरली! शहरात 4 तासांत तब्बल दोन हत्याकांड; तडीपार गुंडांला संपवलं

विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बऱ्याच उशिरापर्यंत चालले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा ९० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाने या परीक्षा उशिरा घेण्याचे ठरविले. मात्र, दहा दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने विद्यापीठाने सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठाद्वारे जाहीर परिपत्रकात ९ हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. यामध्ये बीई-१, बीटेक-१, बीफार्म-१, बीई-३, बीटेक-३, बीफार्म-३, एलएलबी-१(तीन वर्षीय), बीएएलएलबी-१(पाच वर्षीय) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, यापूर्वी विद्यापीठाने १२ परीक्षा स्थगित केल्या होत्या. यामुळे यात आता एकूण २१ परीक्षांचा समावेश होता. मात्र, आता राज्यात कोरोनाचा जोर ओसरत चालला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याने विद्यापीठाद्वारे लांबलेल्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यासाठी तारखा निश्चित केल्या जात आहेत. या तारखा अद्याप घोषित करण्यात आल्या नसल्या; तरी याच महिन्यात त्या परीक्षा सुरू करीत उरकण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यासाठी सोमवारी कदाचित तारखांची घोषणा होणार असल्याचे कळते. मात्र, याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालकांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Set exam
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

उन्हाळी परीक्षा १५ जूनपासून -

विद्यापीठाच्या लांबलेल्या उन्हाळी परीक्षा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यात १५ जूनपासून उन्हाळी परीक्षांचे प्रात्यक्षिक घेण्यास सुरुवात होणार आहे. याशिवाय २९ जूनपासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सहावे सेमिस्टर, चार वर्षीय अभ्यासक्रमातील आठवे आणि दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्याक्रमातील चौथ्या सेमिस्टरची परीक्षा विद्यापीठस्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इतर सेमिस्टरच्या बाबतीत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याशिवाय ५ ते २० मेदरम्यान होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा आता महाविद्यालयांना ३१ मेपर्यंत घेण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()