Pernod Ricard Project: विदर्भात मोठी गुंतवणूक! ८८ एकरात उभा राहणार २५०० कोटींचा डिस्टिलरी प्रकल्प, देशातील सर्वात मोठा

बुटीबोरी नवीन औद्योगिक वसाहतीत पेर्नोड रिकार्ड इंडिया भारतातील सर्वात मोठ्या माल्ट स्पिरीट डिस्टिलरीची स्थापना करणार आहे.
Pernod Ricard Project: विदर्भात मोठी गुंतवणूक! ८८ एकरात उभा राहणार २५०० कोटींचा डिस्टिलरी प्रकल्प, देशातील सर्वात मोठा
Updated on

Pernod Ricard Set to Establish Distillery in Vidarbha: बुटीबोरी नवीन औद्योगिक वसाहतीत पेर्नोड रिकार्ड इंडिया भारतातील सर्वात मोठ्या माल्ट स्पिरीट डिस्टिलरीची स्थापना करणार आहे. यात २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून महाराष्ट्र सरकारसोबत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.

८८ एकरात हा उद्योग उभारणार आहे. त्यात ८०० च्यावर कामगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जीन टुबूल यांनी दिली.
या सामंजस्य करारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासोबत पेर्नोड रिकार्ड इंडियाचे जीन ट्बुल नॅशनल कार्पोरेट अफेअर प्रमुख प्रसन्न मोहिले, वरिष्ठ उपाध्यक्ष गगनदीप सेठी यांनी स्वाक्षऱ्या केल्यात.

डिस्टिलरीज कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात अप्रत्यक्षपणे रोजगारांच्या संधी निर्माण करणार आहे. अल्को-बेव्ह उद्योगातील जागतिक आघाडीवर असलेल्या पेर्नोड रिकार्ड समूहासाठी भारत एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे.
पेर्नोड रिकार्ड इंडिया केवळ देशातच गुंतवणूक करण्यासाठीच नाही तर शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून स्थानिक समुदायासाठी रोजगारांच्या संधी व कौशल्य विकास उपक्रमांनाही प्रोत्साहन देणार आहे. (Latest Marathi News)

या प्रकल्पामुळे विदर्भातील ३५ हजार एकर परिसरातील शेतकऱ्यांना जवस पीक घेतल्यास हे हक्काचे खरेदी केंद्र ठरणार आहे. याशिवाय देशभरातील शेतकऱ्यांकडून वार्षिक आधारावर ५० हजार टनापर्यंत जवस खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्रात जवस लागवडीची क्षमता विकसित करण्यासाठी सरकारसोबत संयुक्तपणे काम करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

Pernod Ricard Project: विदर्भात मोठी गुंतवणूक! ८८ एकरात उभा राहणार २५०० कोटींचा डिस्टिलरी प्रकल्प, देशातील सर्वात मोठा
Bus Accident News: अहमदाबादहून पुण्याला येणारी बस 25 फूट खाली पडली, 2 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

जागतिक नकाशावर भारताचे स्थान उंचावणार
या प्रकल्पामुळे जागतिक नकाशावर भारताचे स्थान उच्च गुणवत्तेच्या माल्टच्या उत्पादनामध्ये उंचावणार आहे. या डिस्टिलरीच्या स्थापनेमुळे नागपूर आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांना चालना मिळणार आहे. स्थानिक उद्योजक आणि शेतकरी समुदायाला विकासाचे नवीन मार्ग उपलब्ध होणार आहेत. (Latest Marathi News)

कंपनीचा उद्देश देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीला गती देण्याचा आहे. या गुंतवणुकीसह कंपनी विकासाचा पाया रचत आहे. कंपनीचे देशभरात २४ बॉटलिंग प्रकल्प आहेत. याशिवाय नाशिक येथील डिस्टिलरीद्वारे काम करीत आहे. कंपनीची नाशिक येथेच अत्याधुनिक डिस्टिलरी आणि वाईनरी देखील आहे, असेही टुबूल यांनी सांगितले.

Pernod Ricard Project: विदर्भात मोठी गुंतवणूक! ८८ एकरात उभा राहणार २५०० कोटींचा डिस्टिलरी प्रकल्प, देशातील सर्वात मोठा
आसाममध्ये मोठा निर्णय! मुस्लीम विवाह कायदा रद्द; 89 वर्षे जुना कायदा नेमका काय होता? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.