८० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत! अतिवृष्टी, पुराने शेतीपिकांचे नुकसान; 'या' कारणांमुळे रखडला निधी

बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी केली नसल्याने अजूनही ८० हजार ७२२ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी पोहोचला नाही.
८० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!
अतिवृष्टी, पुराने शेतीपिकांचे नुकसान; 'या' कारणांमुळे रखडला निधी
Updated on

Unseasonal Rain Agricultural Crop Loss: अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी केली नसल्याने अजूनही ८० हजार ७२२ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी पोहोचला नाही.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झाले होते. त्यातील बाधित ८२ हजार ६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात ५८ कोटी ५३ लाख ११ हजार रुपये इतका निधी जमा करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध व्हावी, याकरिता ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले होते. जिल्ह्यात गेल्यावर्षी २०२३मध्ये मार्च, एप्रिल व मे महिन्यंत अवकाळी पाऊस झाला. २०२१मध्ये ऑक्टोबर, २०२२मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अवकाळी पाऊस झाला.

जून-जुलै २०२३मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीची मागणी सत्ताधारी व विरोधकांनी केली होती. त्यानंतर कृषी विभागाने पंचनामे करून मतदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला होता.

नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत एक लाख ७६ हजार २०१ बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. शासनस्तरावरून डीबीटीद्वारे ८२ हजार ६९८ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ५८ कोटी ५३ लाख ११ हजार १४१ रुपये इतका निधी जमा करण्यात आला आहे.

(Latest Marathi News)

८० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!
अतिवृष्टी, पुराने शेतीपिकांचे नुकसान; 'या' कारणांमुळे रखडला निधी
Weather Update: गारठा आणखी वाढणार; पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान विभागाने वर्तवला अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.