Nagpur : स्वातंत्र्यदिनी शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन?

नागपूरकरांना मिळणार अनोख्या ठेव्याची झलक; अजब बंगला लागला तयारीला
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असल्याची अफलातून कृती करताना वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. असा देदीप्यमान आणि गौरवशाली वारसा असणारी छत्रपती शिवरायांची वाघनखे उपराजधानी नागपूरमध्ये आणली जाणार आहेत. १५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय मध्यवर्ती संग्रहालयात (अजब बंगला) ठेवली जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरून परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झाले आहेत.लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी मंगळवारी करार करण्यात आला. पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशातील या वास्तव्याचे वेळापत्रक खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही सध्या ब्रिटनमध्ये आहे.ती परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार २०२४ पर्यत महाराष्ट्रात येईल, असे प्रयत्न सुरू आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजेची तलवार असल्याची

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

माहिती इतिहासात नोंद आहे.

असा असेल वाघनखांचा प्रवास

१६ नोव्हेंबर : वाघनखांचे मुंबईत आगमन

१७ नोव्हेंबर : श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा (स्थापना)

१७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ : सातारा येथील संग्रहालयात प्रदर्शन

१५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ : शासकीय संग्रहालय (अजब बंगला), नागपूर

एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ : शासकीय संग्रहालय, कोल्हापूर

नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई

१६ नोव्हेंबर २०२६ : वाघनखांचा पुन्हा लंडनच्या व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तू संग्रहालयाकडे प्रवास

nagpur
Chh. Sambhaji Nagar : शेकडो रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा जर्जर ; दोन ‘मल्टिस्पेशालिटी’चा प्रस्ताव शासनाने गुंडाळला

वाघनखांच्या आगमनाबाबत अद्याप शासनातर्फे रीतसर वेळापत्रक मिळाले नाही. मात्र, मोठ्या संख्येत येणाऱ्या शिव व इतिहासप्रेमींची संख्या लक्षात घेता तयारी म्हणून संग्रहालयाची डागडुजी करण्यात येत आहे. यासाठी आर्किटेक्चर नेमण्यात आला असून लवकरच हे काम पूर्ण होईल.

विनायक नीतुरकर, सहाय्यक अभिरक्षक,

शासकीय मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()