Nagpur Crime: आई रागावली म्हणून मुलींनी उचललं टोकाचं पाऊल; वर्धा पोलिसांनी 'त्या' मुलींना घेतलं ताब्यात!

आईने क्षुल्लक कारणासाठी रागावले म्हणून तेरा वर्षांच्या मुलीने सात वर्षांची बहीण आणि मावशीच्या मुलीसह पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal
Updated on

Nagpur 3 minor Girls Left Home as mother Scolded: आईने क्षुल्लक कारणासाठी रागावले म्हणून तेरा वर्षांच्या मुलीने सात वर्षांची बहीण आणि मावशीच्या मुलीसह पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या तिन्ही मुलींना वर्धा रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारीला महिलेच्या १३ आणि सात वर्षीय मुलीसोबत त्यांच्या बहिणीची आठ वर्षांची मुलगी खेळत होती. दरम्यान महिलेने मुलीला रागविले. तो राग तिन्ही मुलींनी मनात त्यामुळे तिघीही खामला येथे आजीकडे जातो असे सांगून घरून साडेसात वाजताच्या सुमारास निघाल्या.

मात्र, त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, न सापडल्याने प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शोधाशोध सुरू झाली. दरम्यान त्या मुंबईच्या रेल्वेगाडीतून जात असताना प्रवाशांना त्यांच्यावर संशय आला. वर्धा येथील स्थानकावर माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

त्यांच्या वडिलांना संपर्क करण्यात आला. त्यांनी मुलींचा ताबा आईकडे देऊ नये असे सांगितल्यावर वर्धा रेल्वे पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून प्रतापनगर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून मुलींना पाटणकर चौकातील बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीने तिन्ही अल्पवयीन मुलींना एक महिन्याकरिता माटे चौकातील श्रध्दानंद अनाथालय वसतीगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

Nagpur Crime
Donald Trump: ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरुच; प्रतिस्पर्धी निक्की हेले यांना साऊथ कॅरोलिनात धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.