Nagpur-Wardha Railway: नागपूर-वर्धा तिसऱ्या रेल्वे लाईनला १२५ कोटी; अर्थसंकल्पात तरतूद, प्रकल्पाला मिळणार गती

नागपूर- वर्धा या ७६ किलोमिटरच्या तिसऱ्या रेल्वे लाईनला केंद्रीय अर्थसंकल्पात पुन्हा १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Nagpur-Wardha Railway: नागपूर-वर्धा तिसऱ्या रेल्वे लाईनला १२५ कोटी;
अर्थसंकल्पात तरतूद, प्रकल्पाला मिळणार गती
Updated on

Nagpur-Vardha Third Line: नागपूर- वर्धा या ७६ किलोमिटरच्या तिसऱ्या रेल्वे लाईनला केंद्रीय अर्थसंकल्पात पुन्हा १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या नव्या मार्गामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार असून वेळेची बचत सुद्धा होईल. गेल्या काही वर्षापासून या मार्गाचे काम सुरू आहे. अद्याप पूर्ण झाले नाही. येत्या दोन वर्षात या मार्गाचे काम होईल, अशी अपेक्षा आहे.


पुढील दोन वर्षात तिसरा रेल्वे मार्ग तयार होईल. त्यानंतर वाहतुकीची गती वाढून वेळेची बचत होणार आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद महत्त्वाची आहे. नागपूर-वर्धा ही तिसरी लाईन ७६ किलोमिटरची आहे. त्याचबरोबर नागपूर-इटारसी ही तिसरी लाईन २८० किलोमीटरची असून यासाठी मागच्या वर्षी ६१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता पुन्हा या वर्षी ३२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच वर्धा-बल्लारशा या १३२ तिसऱ्या लाईनकरीता मागच्या वर्षी ३०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने २०० कोटी रुपये वर्ष २०२४-२५ साठी देण्यात आले आहे. वडसा-गडचिरोलीकरिता मात्र यंदा काहीच मिळाले नाही. नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गाड्या सुद्धा वाढविण्यात आल्या. मात्र मार्ग तेवढेच असल्याने गाड्या वाढूनही वेळेची बचत होत नाही. त्यामुळे या तिसऱ्या नव्या मार्गाची गरज निर्माण झाली. (Latest Marathi News)

१४५ पूल, ११ स्थानके
नागपूर-वर्धा या तिसऱ्या लाईनचे अंतर ७६.३० किलोमिटरचे आहे. यात ११ स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे लाईन दरम्यान १४५ पूल असून यात २ मोठे, १० मध्यम आणि १३३ लहान आहेत. पाच वर्षापूर्वी या प्रकल्पाची किंमत ५४०.०२ कोटी रुपये होती. हा प्रकल्प २०१५ साली मंजूर झाला होता. २०१९-२० पर्यंत तो पूर्ण करायचा होता. मात्र, ६ वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्ण झाला नाही. आता नव्याने ८७ कोटींची तरतूद झाल्याने प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur-Wardha Railway: नागपूर-वर्धा तिसऱ्या रेल्वे लाईनला १२५ कोटी;
अर्थसंकल्पात तरतूद, प्रकल्पाला मिळणार गती
गुंडगिरी खपवून घेणार नाही! पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगलाचा इशारा, रात्रीच स्वीकारला पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार पदभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.