Nagpur Water Supply: नागपूरकरांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने नियमित जलकुंभ स्वच्छ करण्यात येत आहे. येत्या मंगळवारी हनुमाननगर, बुधवारी रेशीमबाग तर शुक्रवारी वंजारीनगर जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपा, ओसीडब्लूने कळविले आहे.
धंतोली झोनमधील वंजारीनगर, रेशीमबाग व हनुमाननगर जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार आहे. १२ डिसेंबरला हनुमाननगर जलकुंभाच्या स्वच्छतेमुळे हनुमाननगर, प्रोफेसर कॉलनी, पीटीएस क्वार्टर, चंदननगर, वकीलपेठ, सिरसपेठ, रेशीमबाग, सोमवारीपेठ, रघुजीनगर, जुनी सोमवारपेठ, विद्यानगरी, मट्टीपुरा या भागात पाणीपुरवठा बंद राहील.
१३ डिसेंबरला रेशीमबाग जलकुंभाच्या स्वच्छतेमुळे जुनी शुक्रवारी, महावीरनगर, गायत्रीनगर झोपडपट्टी, जुने नंदनवन, शिवनगर, भगत कॉलनी, आनंदनगर, नेहरूनगर, सुदामपुरी, ओमनगर, गणेशनगरात पाणी बंद राहील. १५ डिसेंबरला वंजारीनगर जलकुंभ स्वच्छ करण्यात येईल.
त्यामुळे विश्वकर्मानगर, आदिवासी कॉलनी, रिज रोड, म्हाडा क्वार्टर, ताजनगर, शिवराजनगर, रमाईनगर, बजरंगनगर, वेळेकरनगर, सावित्रीबाई फुलेनगर, सोमवारी क्वॉर्टर, जुनी सोमवारी पेठ, आयुर्वेदिक ले-आऊट, रघुजीनगर, तुकडोजीनगर, पोलिस क्वार्टर या भागात पाणीपुरवठा होणार नाही. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.