नागपूर : कधी थांबेल शिशूंचा मरण प्रवास?

मेरे बच्चे को बचाओ ; तुमचे उपकार होतील
नागपूर  : कधी थांबेल शिशूंचा मरण प्रवास?
Updated on

नागपूर : डॉक्‍टर साहाब...डागा रुग्णालयातून डॉक्‍टरांनी मेडिकलमध्ये पाठवलं... मेरे बच्चे को बचाओ.... तुमचे उपकार होतील... व्हेंटिलेटर लगाओ साहाब... अशी विनवणी त्या नवजात शिशूचे माता-पिता करीत होते. हे दृश्‍य बघून इतरांचे ह्दय हेलवाले, परंतु मेडिकलमधील डॉक्टर, आम्ही बाळाला व्हेंटिलेटर लावू शकत नाही, अतिदक्षता विभागात ठेवू शकत नाही. बाळाला काही झाले तर आम्ही जबाबदार नाही, असे उर्मटपणे बोलू लागले. गुरुवारी (ता. २८) दुपाराची घटना.

डॉक्‍टरांनी त्या माता-पित्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले. येथेच डॉक्‍टरांची माणुसकी संपली. १८ दिवसांच्या शिशूची तडफड पाहून पालकांनी आसवे गाळत बाहेर नेले. गावखेड्यासह इतर रुग्णालयातून रेफर करण्यात आलेल्या नवजात शिशूंना मेडिकलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जात नाही. यामुळे शिशूंचा जीवही जातो. हा नवजात शिशूंच्या मरणाचा प्रवास कधी थांबेल, असा संतप्त सवालही नातेवाइकांनी आज मेडिकल प्रशासनाला केला.

नागपूर  : कधी थांबेल शिशूंचा मरण प्रवास?
Mumbai : धारावीत चिमुकल्यावर काकीकडून लैंगिक अत्याचार

वाजिदा तब्बसूम या महिलेची १८ दिवसांपूर्वी डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात प्रसूती झाली. नवजात शिशूच्या छातीवर सूज आल्याचे निदान झाले. येथील डॉक्टरांनी मेडिकलमध्ये रेफर केले. शिशूला व्हेंटिलेटरची गरज होती. शिशूच्या पित्याचे पंक्चरचे दुकान आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मेडिकलची कॅज्युल्टी गाठली. गरिबांसाठी मेडिकल हाच आधार आहे, येथे लेकराचे उपचार होतील, ही भाबडी आशा त्यांना होती. मात्र मेडिकलमध्ये कॅज्युल्टीतच ठेवले. व्हेंटिलेटरची गरज असूनही त्याला व्हेंटिलेटर लावले नाही. वारंवार विनवणी करूनही त्याला एनआयसीयूत भरती केले नाही.

संसर्ग होण्याचे सांगतात कारण

मेडिकलच्या नवजात शिशू काळजी केंद्रात केवळ मेडिकलच्या वॉर्डात जन्माला आलेल्या नवजात शिशूंना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जातात. रेफर नवजात शिशूंना मेडिकलमध्ये नवजात शिशू काळजी कक्षात ठेवल्यास इतरांना संसर्ग होईल हे कारण सांगण्यात येते. दुसरा नवजात शिशू कक्ष तयार करण्यात यावा असे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे म्हणाले.

देवदूतासारखे ते धावून आले…

मेडिकलच्या प्रवेशद्वारावर छातीशी कवटाळून डबडबलेले डोळे घेऊन निघालेली माय दिसली. बाजुलाच चिमुकल्याचे वडिल होते. हे दृश्य बघून एका व्यक्तीचे हृदय हेलावले. त्याने विचारपूस केली. या सह्दयी माणसाने या नवजात शिशूला तत्काळ ऑटोतून एका खासगी रुग्णालयात पाठवले. चिमुकल्यावर येणाऱ्या खर्चाची हमी दिली. त्या देवदूताचे नाव गणेश चाचेरकर असे आहे. मातापित्यांनी त्या देवदूताचे आभार मानले.

नागपूर  : कधी थांबेल शिशूंचा मरण प्रवास?
नागपूर : सदस्यांच्या प्रश्‍नावरील कारवाईला ठेंगा

मेडिकलमधून नवजात बाळांला शिशू काळजी केंद्रात दाखल करण्यास नकार दिला. तुमच्या जबाबदारीवर वॉर्डात उपचार होतील. त्यांना व्हेंटिलेटर मिळणार नाही, यामुळे मृत्यू होण्याची भिती आहे. हे डाक्टरच सांगतात. गावखेड्यातून, दुर्गम भागातून नवजात शिशूंना व्हेंटिलेटर का मिळत नाही. नवजात शिशू काळजी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात येत नाही. वॉर्डात त्यांच्यावर उपचार केले जातात. कॅज्युल्टीतून डॉक्टर बाळाला व्हेंटिलेटर लावता सांगून बोळवण करतात. काही झाले तर आम्ही जबाबदार नाही. सही द्या तरच उपचार करू, सांगा असा नवजात मुलांच्या मरणावरच मेडिकल टपले आहे.

-अनिकेत कुत्तरमारे, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.