नागपूर ः ड्रग्सची (एमडी) (Drugs) नशा करणाऱ्यांमध्ये श्रीमंत घरातील युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. युवा पिढी ड्रग्सच्या व्यसनापायी बरबाद होऊ नये म्हणून ‘ड्रग्स फ्री सीटी’ (Drugs free city) संकल्पना साकारण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू केले असून काही दिवसांतच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. (Nagpur will become Drugs free city said Police commissioner)
एमडी पावडर खूप महाग असते. त्यामुळे एमडीची नशा करणारे श्रीमंत घरातील मुले-मुली आहेत. त्यामुळे छाप्यात सापडलेल्या एमडी तस्करांकडून आता नशा करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यात येत आहे. ड्रग तस्कर पकडल्या गेल्यानंतर श्रीमंताची मुलांकडून ड्रग्सच्या मागणी वाढते आणि नव्याने तस्कर तयार होते. त्यामुळे कॉलेजवयीन विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना ड्रग्सचे व्यसन जडत आहे. आता थेट ड्रग्स सेवन करणाऱ्यांवर कारवाई करीत ‘चेन ब्रेक’ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही सीपी अमितेश कुमार म्हणाले.
अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात दोन दिवसांपासून नागपूर गुन्हे शाखेने धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलिसांनी छापेमारीमध्ये १३० ग्रॅम एमडी, १३३ ग्रॅम चरस, अडीच किलो गांजा असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे दोन केंद्रीय आणि व पाच युनिटची पथके तयार केली. तर प्रत्येक पोलीस ठाण्यात वेगवेगळे असे ७९ पथके तयार करून सोमवारी दुपारी ४ वाजेपासून शहरात छापेमारीला सुरुवात करण्यात आली. यात अनेकांकडे ट्रकचे टायर, ट्यूब आणि छोट्या छोट्या वस्तूंमध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवलेले सापडले. पोलिसांनी एमडी, चरस, गांजासारख्या पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध १३ गुन्हे दाखल करून २० जणांना अटक केली आहे.
अल्फ्राझोलम विक्रीवर ‘वॉच’
अल्फ्राझोलम व गुंगी आणणाऱ्या औषधांचा वापर नशेकरीता करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भातील औषधांची विक्रीची माहिती सादर करण्याचे आदेश अन्न व औषध विभागाच्या मदतीने कंपन्यांकडून मागितली आहे. यातून या औषधीचा गैरवापर लक्षात येईल व नशाखोरीसाठी वापर करणाऱ्यांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
जेष्ठ नागरिकांचे लसीकरण
शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंदी असलेल्या ५ हजार ७८५ वृद्धांचे कोरोना लसीकरण पोलिस विभागामार्फत केल्या जाणार आहे. २१२ वृद्ध एकटे राहतात. त्यांना लसीकरणासाठी लाईनमध्ये उभे राहावे लागते तर कुणाला केंद्रावर जाता येत नाही. अशा वृद्धांची यादी बनविण्यात येत असून पोलिसांचे वाहनातून घरी नेआण करण्यात येईल, अशी माहिती सीपी अमितेश कुमार यांनी दिली.
(Nagpur will become Drugs free city said Police commissioner)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.