Winter Session 2023 : 'संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात', संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सरकार विरुद्ध हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले, की बळीराजा अवकाळीने त्रस्त व सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त आहे.
nagpur winter session 2023 strike for farmers loan waiver demand of opposition political leaders politics
nagpur winter session 2023 strike for farmers loan waiver demand of opposition political leaders politicsSakal
Updated on

Winter Session 2023 : ‘‘अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापूस, सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी उद्‌ध्वस्‍त झाला आहे. असे असताना सरकार पंचनामे करण्यात गुंतले आहे.

यात वेळ न घालवता अगोदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत आणि त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,’’ अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आजपासून सुरू झाले. या अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला.

nagpur winter session 2023 strike for farmers loan waiver demand of opposition political leaders politics
Winter Session 2023 : औषध खरेदीसाठी ‘महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ कागदावरच

सरकार विरुद्ध हल्लाबोल करताना वडेट्टीवार म्हणाले, की बळीराजा अवकाळीने त्रस्त व सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असून त्यांच्याशी निष्ठुरपणे वागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारचा निषेध केला.

या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, जयंत पाटील, अनिल देशमुख, सुनील प्रभू, यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी हातात निषेधाचे काळे फलक हातात घेत ‘खोके सरकार हाय हाय’, ‘शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०’ अशी घोषणाबाजी केली.

nagpur winter session 2023 strike for farmers loan waiver demand of opposition political leaders politics
Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन आले अन् पंधरा दिवसांत बुजविले तीनशे खड्डे; महापालिकेची व्हीव्हीआयपींसाठी तत्परता

संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात

अतिवृष्टी, अवकाळीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे व शेतकऱ्यांच्या व्यथांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी गळ्यात संत्र्याच्या व कापसाच्या बोंडांच्या माळा घालून विधानभावनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. या वेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.