Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन आले अन् पंधरा दिवसांत बुजविले तीनशे खड्डे; महापालिकेची व्हीव्हीआयपींसाठी तत्परता

अधिवेशनासाठी व्हीव्हीआयपी शहरात येणार असल्याने महापालिकेने तत्परतेने १५ दिवसांत तीनशे खड्डे बुजविले.
nagpur winter session nagpur municipal corporation repair 300 potholes in just 15 days
nagpur winter session nagpur municipal corporation repair 300 potholes in just 15 days
Updated on

Winter Session Nagpur : अधिवेशनासाठी व्हीव्हीआयपी शहरात येणार असल्याने महापालिकेने तत्परतेने १५ दिवसांत तीनशे खड्डे बुजविले. यात सर्वाधिक सिव्हिल लाइन्स व विधानभवन परिसरातील खड्ड्यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील इतर भागांमध्ये नागरिक नसतात का, असा सवाल केला जात आहे.

(nagpur winter session nagpur municipal corporation repair 300 potholes in just 15 days)

शहरात अधिवेशनानिमित्त मंत्री, आमदार शहरात आले आहेत. त्यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शहरात आल्या होत्या. राष्ट्रपतींचा दौरा व अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने सिव्हिल लाइन्स, राजभवन, मेडिकल भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविले.

सर्वाधिक १०० खड्डे मंगळवारी झोनमध्ये बुजविण्यात आले. मंगळवारी झोनमध्ये राजभवन परिसर असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येथे वास्तव्यास होत्या. त्यामुळे केवळ राजभवन परिसरातील ६० खड्डे बुजविण्यात आल्याचे अधिकाऱ्याने नमुद केले. त्याचवेळी विधानभवन परिसर असलेल्या धरमपेठ झोनमध्येही ९२ खड्डे बुजविण्यात आले.

nagpur winter session nagpur municipal corporation repair 300 potholes in just 15 days
Online Gaming : ऑनलाईन गेमिंगवर आकारणार २८ टक्के जीएसटी

या झोनमधील सिव्हिल लाइन्समधील खड्डे बुजवून रस्ते समतल करण्यात आले. महाराजबाग ते जुन्या व्हीसीएपर्यंत एका बाजूने सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु दुसऱ्या बाजूने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. या रस्त्यांवरील २२ खड्डे युद्धस्तरावर बुजविण्यात आले.

गेल्या काही दिवसांत रात्रीही खड्डे बुजविण्याची कामे सुरू होती, असे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले. महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने कंत्राटदाराऐवजी स्वतः खड्डे बुजविल्याने जवळपास सव्वा कोटी रुपयांची बचत केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

nagpur winter session nagpur municipal corporation repair 300 potholes in just 15 days
Nagpur News : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

झोननिहाय बुजविण्यात आलेले खड्डे

झोन - बुजविलेल्या खड्ड्यांची संख्या

लक्ष्मीनगर - ८

धरमपेठ - ९२

हनुमाननगर - ०५

धंतोली - २४

नेहरूनगर - ०२

गांधीबाग - ००

सतरंजीपुरा - ०७

लकडगंज - २२

आशीनगर - १८

मंगळवारी झोन -१००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.