Asaram Bapu Banner: आसाराम बापूच्या बॅनरला महिलांनी फासलं काळं, बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या फलकाला काळे फासून महिला काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. तसेच फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
Asaram Bapu Banner: आसाराम बापूच्या बॅनरला महिलांनी फासलं काळं, बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
Updated on

Black Color Thrown on Asaram Bapu: लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या फलकाला काळे फासून महिला काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. तसेच फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नुसरत अली यांच्या नेतृत्वात बैद्यनाथ चौकात हे आंदोलन करण्यात आले. अलीकडे आसाराम बापू याच्या समर्थकांकडून शहरात मोठ मोठे फलक लावण्यात आले आहेत.

मातृ-पित्रु वंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बैद्यनाथ चौक राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांनाही यास जबाबदार धरण्यात आले. बलात्कारी बाबाचे समर्थन करणे अतिशय गंभीर बाब आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात हे फलक लावण्यात आले असल्याने आणखीच गंभीर बाब आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशई मागणी यावेळी नॅश अली यांनी केली. आंदोलनात कल्पना गाडगे, संगीता खापर्डे, गीता जळगावकर, ॲड, वंदना चहांदे, नंदा अतकरे, कल्पना द्रोणकर, मायाताई धापोडकर, भानुमती नंदनवार, रजनी राऊत, राणी साळवे, वंदना शेवतकर, किरण मोहिते, समता गणवीर, रेखा गारोडी, त्रिवेणी नंदनवार, किरण रणदिवे, रोशनी पराते, स्मिता खवासे, संगीता खवासे, पुष्पा नररारेआदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Asaram Bapu Banner: आसाराम बापूच्या बॅनरला महिलांनी फासलं काळं, बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
Electoral Bond Scheme: इलेक्टोरल बॉण्ड असंवैधानिक, सुप्रीम कोर्टानं घातली बंदी; सरकारला झटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.