नागपूर : महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहेही नाहीत

आरोग्याशी खेळ, बाहेर पडणाऱ्या मायमाऊलींना कार्यालयाचाच आधार
Nagpur women for Enough There are no toilets kgm00
Nagpur women for Enough There are no toilets kgm00sakal
Updated on

नागपूर : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेविका असलेल्या शहरात प्रसाधनगृहाअभावी महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडणाऱ्या महिलांना १५ ते २० किमीपर्यंत प्रसाधनगृहेच मिळत नसल्याने लघवी रोखून धरावी लागत आहे. परिणामी मूत्र मार्गात संक्रमण, किडनीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. महिलांसाठी ठराविक अंतरावर प्रसाधनगृहे नसल्याने घरातून निघाल्यानंतर परत घरी परत येईपर्यंत किंवा कार्यालयात पोहोचेपर्यंत महिलांना संयम पाळावा लागत आहे.

Nagpur women for Enough There are no toilets kgm00
कर्नाटकचं राजभवन गाठा अन् बोम्मई सरकार पाडा; सेनेचं भाजपला आव्हान

शहरात दररोज लाखो पुरुष, महिला नोकरी, खरेदी, भाजी खरेदीसह विविध कामांसाठी बाहेर पडतात. घरापासून गंतव्य ठिकाणी पोहोचताना अनेकांना लघवी लागते. त्यासाठी शहरात पुरेसे सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. परंतु शहरत १०२ सार्वजनिक शौचालये असून यात केवळ ७७३ सिट्‍स आहे. यात पुरुषांसाठी ४८८ तर महिलांसाठी २८५ सिट्‍स आहे. शहराची ३० लाख लोकसंख्येच्या शहरात ५० टक्‍क्यांपर्यंत महिला असूनही प्रसाधनगृहातील सिट्‍सच्याबाबत महापालिकेचा भेदभाव दिसून येत आहे. महिलांबाबत विचार केल्यास १५ लाखांच्या संख्येमागे केवळ २८५ सिट्‍स आहे. अर्थात पाच हजार २६३ महिलांमागे एक सिट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. परंतु अनेक प्रसाधनगृहे सहज दृष्टीस पडेल अशा ठिकाणी नाही. याशिवाय ठराविक अंतरावर नसल्याचे दिसून येत आहे. वर्धमाननगरातून बजाजनगरपर्यंत जात असलेल्या महिलेसाठी एकही प्रसाधनगृह नाही. या भागातून अऩेक महिला नोकरीनिमित्त पश्चिम नागपूर परिसरात येतात. त्यांना केवळ कार्यालयाचाच आधार आहे. एवढे अंतर पार करण्यासाठी महिलांना जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. कार्यक्रम, खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना तर घरी परत येईस्तोवर संयम बाळगावा लागतो. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते दरवर्षी किडनीच्या आजाराने लाखो नागरिक ग्रस्त होतात. यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. परंतु अद्यापही महापालिका शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रसाधनगृहेही उपलब्ध करून देऊ न शकल्याने शहरातील नागरिक, विशेषतः महिलांना किडनीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

Nagpur women for Enough There are no toilets kgm00
नाशिक : हुडहुडी भरली; तापमान १२ अंशांवर

बाजारांमध्ये समस्या

कोरोनाच्या काळानंतर शहरात हिवरीनगर, संजय गांधीनगरसह अनेक भागात रस्त्गांंवर बाजार सुरू झाले आहेत. या बाजारांमध्ये कुठलीही सुविधा नाही. विक्रेत्या महिला तसेच खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याने त्यांना असुविधेचा भार सहन करावा लागत आहे.

युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनची शक्यता

लघवी रोखून धरल्याने युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात मूत्र मार्गात संक्रमणाचा महिलांना अधिक धोका आहे. मूत्रमार्गातील इन्फेक्शन किडनीतही प्रवेश करू शकतात. लघवी लागल्यानंतर विलंब केल्यास पुन्हा ती किडनीकडे जाते. ही किडनी स्टोन होण्याची सुरूवात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

"महिलांसाठी प्रसाधनगृहाची वानवा आहेच. याबाबत महिला व बाल कल्याण समितीने अऩेकदा प्रशासनाला निर्देश दिले. परंतु प्रसाधनगृहासाठी नागरिकही विरोध करीत आहे. जागेअभावी प्रसाधनगृह रखडले. परंतु पुढील बैठकीत याबाबत प्रशासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे."

- दिव्या धुरडे, सभापती, महिला व बाल कल्याण विशेष समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()