Nagpur Crime : साधूच्या वेशात आले 'बंटी-बबली', वृद्ध दांपत्याला घातला गंडा, रोकड आणि दागिने केले लंपास

साधूच्या वेशात आलेल्या बंटी-बबलीने वृद्ध दाम्पत्याला पूजेच्या बहाण्याने दागिने आणि रोख दहा हजार रुपये घेऊन गंडा घातला.
crime news
crime news esakal
Updated on

Nagpur Crime: साधूच्या वेशात आलेल्या बंटी-बबलीने वृद्ध दाम्पत्याला पूजेच्या बहाण्याने दागिने आणि रोख दहा हजार रुपये घेऊन गंडा घातला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिघोरी येथील योगेश्‍वरीनगरात घडली.

साधूराम बळीराम दमाहे (वय ६६) असे वृद्धाचे नाव आहे. ते खासगी काम करतात. साधूराम दमाहे आणि त्यांची पत्नी या दोघांचीही प्रकृती ठीक राहत नाही. त्यांनी अनेक उपचार केले. दरम्यान त्यांच्याकडे भगवे कपडे परिधान केलेला एक पुरुष आणि एक महिला आली. ते दोन दिवस सतत येत असल्याने साधूराम यांच्या पत्नीने त्यांना प्रकृती ठीक राहत नसल्याचे सांगितले.

त्यावरून त्यांनी घरात अनिष्ट शक्तीचे वास्तव्य असल्याने घरात पुजा करावी लागेल असा सल्ला दिला. यावेळी साधूराम यांना नारळ देत, ते शंकराचा मंदिरात फोडण्यास सांगितले. याशिवाय त्यांच्या पत्नीला पूजेत ठेवण्यासाठी घरातील दागिने आणि पैसे आणण्यास सांगितले. त्यातून त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये पूजेसाठी दोघांनाही आणून दिले.

त्यांनी साधूराम यांच्या पत्नीला घरातील देवघरात पाठवून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेले. परत येताच दोघेही न दिसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

crime news
VidhanPrishad: महाराष्ट्राची विधानपरिषद झाली १०० वर्षांची; आठवलेंपासून नार्वेकरांपर्यंत आठवणींना उजाळा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.