Nagpur : बेसा- बेलतरोडी, पिपळा घोगली ग्रामपंचायत बरखास्त

जिल्हा परिषदेचे क्षेत्र झाले कमी
Gram Panchayat
Gram Panchayatesakal
Updated on

नागपूर : बेसा-बेलतरोडी व पिपळ-घोघली या दोन ग्रामंचायतींची मिळून एक नगरपंचायत करण्यात आली आहे. ‘बेसा- पिपळा’ या नावाने ही नगरपंचायत असणार आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली. त्यामुळे विद्यमान ग्रामपंचायत बरखास्त झाली.

दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायत करण्याची मागणी होती. त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्य शासनाने याला मंजुरी दिली. सप्टेंबर महिन्यातच यावर सूचना व आक्षेप मागविण्यात आले होते. शुक्रवारी याला अंतिम रूप देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद क्षेत्र कमी झाले आहे. परंतु यामुळे एकही जिल्हा परिषद सर्कल कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या सदस्यत्वावर परिणाम होणार नाही. दोन्‍ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते.

प्रशासकाची नियुक्ती

नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना निघाल्याने दोन्ही ग्रामपंचायती बरखास्त झाल्या. त्यामुळे येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची प्रशासन म्हणून नियुक्त केली आहे. येथील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत होती.

बेसा- बेलतरोडी, पिपळा- घोगली ग्रामपंचायत बरखास्त

आचारसंहितेचा भंग?

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत आचारसंहिता असणार असून तिचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला होता. त्यामुळे हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याची चर्चा होत आहे.

एनएमआरडीएच्या कक्षेतून बाहेर

या दोन्ही ग्रामपंचायती एनएमआरडीच्या कक्षेत येत होत्या. परंतु आता दोन्ही ग्रामपंचायती मिळून नगरपंचायत झाल्याने त्या एनएमआरडीएच्या कक्षेतून बाहेर निघाल्याचे सांगण्यात येते.

या क्षेत्राचा असणार समावेश

मौजा बेसा सर्व्हे नं. १ ते ९६

मौजा बेलतरोडी सर्व्हे नं. १ ते १४२

मौजा पिपळा सर्व्हे नं. १ ते २२१

मौजा घोघली सर्व्हे नं. १ ते ४१

बहादुरा प्रतीक्षेतच

बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगलीसह बहादुरा- खरबी- गोन्ही सिम मिळून एक नगरपंचायत करण्याची अधिसूचना १३ सप्टेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली होती. यावर ३० दिवसांच्या आता सूचना व आक्षेप मागविण्यात आले होत. यावर सुनावणीही झाली. परंतु फक्त बेसा-पिपळा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना करण्यात आली. बहादुरा नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बहादुरा नगरपंचायतीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.