नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. तीन महिन्याची मुदतवाढ १७ ऑक्टोबर रोजी संपत असल्याने त्यापूर्वीच निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येते.
२०२० मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जि.प.च्या सार्वत्रिक निवडणुका होऊन १८ जानेवारी २०२० रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव असल्याने या पदावर कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी माजी मंत्री सुनील केदार यांचे खंद्दे समर्थक मनोहर कुंभारे निवड झाली होती.
आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यामध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारेंचाही समावेश होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या १६ जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश करून निवडणुका घेतल्या. केळवद सर्कल हा महिलांसाठी आरक्षित झाल्याने मनोहर कुंभारेंच्या पत्नी व विद्यमान उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारेंना रिंगणात उतरविले.
त्यांचा विजयही झाला उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. गत १७ जुलै २०२२ रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात असल्याने जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण निघाले नाही.
परिणामी प्रशासनाकडून १६ जुलैला उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रमही जाहीर केला होता. परंतु तत्पूर्वीच शासनाने तीन महिन्याची मुदतवाढ दिली. नुकतेच शासनाने राज्यातील सर्व जि.प. अध्यक्षांचे आरक्षण काढले. यामध्ये नागपूर जि.प.ला पुढील अध्यक्ष अनुसूचित जमाती प्रवर्गातून राहणार हे निश्चित झाले. तीन महिन्यांची मुदतवाढ १७ ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपूर्वी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.