Zomato: फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरातून, सीईओ राकेश रंजन यांनी दिली रंजक माहिती

ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरातून झाल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’ दरम्यान दिली
Zomato: फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरातून, सीईओ राकेश रंजन यांनी दिली रंजक माहिती
Updated on

Zomato Originated form Nagpur: ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरातून झाल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’ दरम्यान दिली.

खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भच्या स्टार्टअपवरील चर्चासत्रातील एंजेल इन्व्हेस्टर शशिकांत चौधरी यांनी राकेश रंजन यांना मुलाखतीत बोलते केले. झोमॅटोबाबत सांगताना राकेश रंजन म्हणाले,‘सात वर्षांपूर्वी मी झोमॅटो जॉईन केले. त्यावेळी झोमॅटो अॅप लाँच करणारे पहिले शहर नागपूर होते. याच संवाद साधत असल्याबद्दल गर्व वाटतो. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक जे खाद्यपदार्थ कुठल्याही पारंपरिक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाहीत, असे पदार्थ ऑर्डर करायचे.

वेगळ्या प्रकारच्या, नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे ऑर्डर अधिक यायचे. त्यानंतरच्या टप्प्यात नियमित ग्राहक वाढलेत. ते रोजच्या नाश्त्यातील, जेवणातील पदार्थ मागवू लागलेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिझ्झा, डेझर्ट यांचा समावेश होता. (Latest Marathi News)

आता ग्राहकांना राजस्थानी तसेच इतर प्रादेशिक जेवण त्या-त्या पारंपरिक अनुभवासह हवे आहे. त्यादृष्टीने आम्ही ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. हे एक नवीन आव्हान आमच्यापुढे आहे.’ मुलाखतीत रंजन यांनी ग्रोथ आणि प्रोफॅटिबिलिटी यातील परस्परपूरकता, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याकडे भारतीयांचा वाढता कल तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप क्षेत्रातील इतर स्पर्धक याबाबत दिलखुलास मते मांडली.

Zomato: फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या झोमॅटोचा जन्म नागपुरातून, सीईओ राकेश रंजन यांनी दिली रंजक माहिती
Anti Drone System: अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल पुरवणार सुरक्षा कवच; अशी असेल 'अँटी ड्रोन सिस्टिम'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.