नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात ३० लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या तीन सदस्य समितीने चौकशी करावी, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रकरणात दोषी आढळलेले बालविकास अधिकारी सध्या पसार आहे. तर या प्रकरणात अनेक जणांचा समावेश असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा महामंत्री उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव यांनी पत्रपरिषदेत केला.