Nagpur ZP School : जिल्हा परिषदेच्या आठ टक्के शाळांचीच पटसंख्या शंभरावर!

शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असले तरी पटसंख्या वाढताना दिसत नाही. जिल्ह्यात जि. प. च्या १ हजार ५१२ शाळा आहेत.
ZP School
ZP SchoolSakal
Updated on

नागपूर - शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असले तरी पटसंख्या वाढताना दिसत नाही. जिल्ह्यात जि. प. च्या १ हजार ५१२ शाळा आहेत. यातील केवळ ८ टक्के अर्थात १२४ शाळांचीच पटसंख्या शंभरावर आहेत. तर १३० शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत. १ हजार ३८८ शाळांमध्ये शंभरपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. सर्वाधिक पटसंख्या ही सावनेर तालुक्यातील चनकापूर शाळेची आहे.

जि.प. च्या शाळांचे डिजिटलायझेशन करून येथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना-उपक्रम राबविण्यात येतात. मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकांसह माध्यान्ह भोजन, प्रवास भत्ता आदींचा समावेश आहे. असे असतानाही या शाळांचा पट वाढण्याऐवजी दरवर्षीच घटत चालला आहे.

जिल्ह्यात जि. प.च्या १ ते ५ व १ ते ८ च्या १ हजार ५१२ शाळा आहेत. येथे एकूण ६७ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या शाळांमध्ये सुमारे चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर असली तरी, आजही साडे आठशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातच अनेक शाळांमध्ये विषयनिहाय शिक्षक नसल्याची माहिती आहे.

त्याउलट ग्रामीण भागातीलच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वर्षाकाठी पटसंख्या वाढतच आहे. या शाळांमध्ये सुविधा चांगली असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विषयनिहाय शिक्षकही उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामीण पालकांचाही आपल्या पाल्याला जि.प. शाळांमध्ये पाठविण्याकडे कल कमी होत असल्याचे दिसते.

शंभरावर विद्यार्थी असलेल्या तालुका निहाय शाळा

तालका - शाळा

भिवापूर - ९

कुही - ८

उमरेड - ८

नागपूर(ग्रा.) - १२

रामटेक - १२

हिंगणा - २०

  • काटोल - ११

  • नरखेड - १३

  • मौदा - १७

  • कामठी - १३

  • सावनेर - १३

  • पारशिवनी - २

  • कळमेश्वर - ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.