Car Cover : श्वानांना रोखण्यासाठी खिळेयुक्त कारचे कव्हर! श्वानप्रेमींमध्ये नाराजी

बाजारात आणि ऑनलाइन विक्रीला काय येईल याचा काही नेम नाही.
Nailed car covers
Nailed car coverssakal
Updated on

- अखिलेश गणवीर

नागपूर - बाजारात आणि ऑनलाइन विक्रीला काय येईल याचा काही नेम नाही. पावसाळ्यात कुत्रे कारवर बसून घाण करतात. तसेच छतावरील टप आणि काचेचेही नुकसान करतात. हे टाळण्यासाठी आता कारचे खिळेयुक्त कव्हर विक्रीला आले आहे. पण यामुळे मात्र, श्वानांना इजा होत असल्याने हा प्रकार अमानुषपणाचा आहे, असे मत श्वान प्रेमीं व्यक्त करीत आहेत.

शहरात सर्वात मोठी समस्या ही कार पार्किंगची आहे. कारची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. घरात पार्किंगला जागा नसली की नागरिक घरापुढील रस्त्याच्या बाजूला कार लाऊन मोकळे होतात. मोकाट कुत्र्यांचा वावर अशा सार्वजनिक रस्त्यावर नेहमीच असतो. रात्रीला कुत्रे कारच्या टपावर चढतात. घाण करतात. यामुळे टपला ओरखडे पडतात.

त्यामुळे श्वानांपासून कारचा बचाव करण्यासाठी खास खिळेयुक्त कार कव्हर बाजारात आले आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात होऊ लागली आहे. हजार रुपयांपासून तर ४ हजारांपर्यंत ते बहुतांश प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

खिळेयुक्त कार कव्हरने श्वान जखमी होतात. असे करणे चुकीचे असून ती एक प्रकारे प्राणी क्रूरता आहे. श्वान व कार दोन्हीचा बचाव होईल, असे साधे रबरचे कव्हर वापरणे योग्य ठरते. शहरात असे खिळेयुक्त कार कव्हर वापरले जात असल्याचे दिसून येत आहे जे निंदनीय आहे

- डॉ. हेमंत जैन, श्वान, पशू व पक्षी तज्ज्ञ

पावसाळ्यात श्वानांना आश्रय हवा असतो. शहरात ९९ टक्के लोक रस्त्याच्या बाजूला कार उभी करतात. खिळेयुक्त कव्हर वापरणे हा प्रकार अमानुषपणाचा आहे. शहरात धंतोली, रामदासपेठ सारख्या उच्चभ्रू वस्तीत असे कव्हर मुख्यतः वापरले जात आहेत.

- स्मिता मिरे, संचालक- सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशन (ॲनिमल वेल्फेअर संस्था)

श्वान जखमी होत असल्याने संताप

कारचे नुकसान टाळण्यासाठी साधे कव्हर वापरले जाऊ शकते. मात्र, खिळेयुक्त कव्हर वापरणे अमानुष पणाचे लक्षण आहे. यामुळे श्वान जखमी होतात. हा प्रकार निंदणीय असल्याचा संताप प्राणी प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.