नारायण राणेंची भाषा शिवसैनिकांसारखीच; तेव्हा कारवाई होत नाही

Minister Ramdas Athawale
Minister Ramdas Athawaleesakal
Updated on

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वापरलेली भाषा ही शिवसैनिकाचीच आहे. अशी भाषा शिवसैनिक कायम वापरतात. एका केंद्रीय मंत्र्यांना अशी अटक करणे चुकीचे आहे. त्यांनी काही खून केला नाही. पोलिसांवर दबाव आणून अशाप्रकारची सूडबुद्धीतून ही कारवाई होत असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

विदर्भातील स्थायी स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत पदाधिकाऱ्यांनी रिपाइंत प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांशी संवाद साधला. राणेंचे मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य व त्यानंतर त्यांना झालेली अटक यावरून राज्यात गदारोळ माजला आहे. शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.

Minister Ramdas Athawale
मेडिकल : डॉक्टरकडून इंजिनिअरला मारहाण; छेड काढल्याचा गैरसमज

आठवले म्हणाले, शिवसैनिक अर्वाच्य भाषेत बोलतात. तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. राणेंची भाषा ही देखील शिवसैनिकांसारखीच आहे. त्यामुळे एका संवैधानिक पदावर असलेल्या मंत्र्याला अशी अटक करणे अयोग्य आहे. अटकेचा मी निषेध करतो, असे आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइं आठवलेचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, राजन वाघमारे, बाळासाहेब घरडे, भीमराव बन्सोड, केशवराव ढाबरे, महेंद्र मानकर उपस्थित होते.

महागाई वाढली, मी काय करू?

महागाई वाढत आहे. सर्वसामान्य त्रस्त होत आहेत. केंद्र महागाई कमी करण्यात अपयशी ठरत आहे. यावर आठवलेंनी महागाई वाढली, मी काय करू? असे उत्तर दिले. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार सरकारी मालमत्ता विकत आहे. केंद्र सरकार दिवाळखोरीत आले का, यावर खासगीकरणातून सरकार विकासकामे करीत असल्याचे आठवलेंनी मिळमिळीत उत्तर देत स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.

मराठ्यांना १२ टक्के आरक्षण द्या

केंद्र शासनाने आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. आता मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे. राज्याने निर्णय घ्यावा. मराठांना १२ टक्के आरक्षणास देण्यास हरकत नसल्याचे आठवले म्हणाले. ओबीसींच्याही २७ टक्के आरक्षणाचे तीन भागात वर्गीकरण अर्थात विभाजन करून इतरांना न्याय देता येऊ शकतो, याकडे आठवलेंनी लक्ष वेधले. ओबीसींच्या जनगणनेसाठी बिहारने पुढाकार घेतला. आपण जातिनिहाय जनगणनेचे समर्थक असून, यातून कुणाची किती लोकसंख्या कळेल असे आठवले म्हणाले. तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाचे धोरण ठरवावे असे ते म्हणाले.

Minister Ramdas Athawale
रसायनशास्त्र विभाग प्रमुखांची आत्महत्या, पतीच्या मृत्यूनंतर होता मानसिक तणाव
रिपाइंला विदर्भात बळकट करायचे आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पक्ष वाढवायचा आहे. भंडारा जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सर्व पॅनेल पक्षात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपसोबत लढू. सन्मानजनक जागा न दिल्यास बघू. परंतु, आपण नव्हे तर भाजपच आपल्याला सोडत नाही.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()