Shriram Pawar : श्रीराम पवार यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

तीन दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Shriram Pawar
Shriram Pawarsakal
Updated on

नागपूर : तीन दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सी. मो. झाडे फाउंडेशनतर्फे नागपुरात चालविण्यात येणाऱ्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून २०१३ पासून देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संस्थेचे विश्वस्त नानाभाऊ समर्थ आणि बळवंत मोरघडे यांनी माहिती देताना सांगितले की, श्रीराम पवार हे लेखक, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. ते पुण्याच्या गोपाळकृष्ण गोखले अकादमीचे संचालक आहेत. तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे मानद प्राध्यापक आहेत. येत्या २० जुलै रोजी नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते पवार यांना सन्मानित केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.