नक्षलसमर्थक प्रा. साईबाबाची हृदयाची तपासणी; पोलिसांची सुरक्षा

मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त नक्षलसमर्थक साईबाबावरील उपचारासाठी पूर्वी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत होता.
Saibaba
Saibabasakal
Updated on

नागपूर - नक्षलसमर्थक असलेले दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ प्रा. जी. एन. साईबाबा यांना हृदयाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले होते. तब्बल तासभराची तपासणी केली. यावेळी पोलिसांचा ताफा तैनात होता. साईबाबा यांच्यावर आवश्‍यक असलेले सर्व उपचार मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच होऊ शकतात, असा अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्यावर आता येथे उपचार होत आहेत.

मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त नक्षलसमर्थक साईबाबावरील उपचारासाठी पूर्वी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत होता. दीड वर्षांपूर्वी दिव्यांग असलेल्या साईबाबा यांना विविध आजार असल्याने खासगी डॉक्‍टरांमार्फत तपासणी व उपचार करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केला होता. त्यानुसार तेव्हा त्या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने उपचाराला समंती दिली होती, परंतु न्यायालयाने तपासणीदरम्यान मेडिकलच्या अधिष्ठात्याने निर्धारित केलेले डॉक्‍टर्स उपस्थित असतील, अशी अट घातली.

Saibaba
हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार! विधिमंडळातील बैठकीत चर्चा

सर्व निदान चाचण्यांसह उपचार सुपर स्पेशालिटीतच होतील, असेही सुचविले होते. साईबाबाच्या पित्ताशयात त्यावेळी खडे झाले होते. हृदयाचा आणि किडणीचा त्रास असल्याचे बोलले जात होते. मेडिकलचे सर्जरी विभागप्रमुख डॉ. राज गजभिये, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोस्वामी यांच्यासह सुपर स्पेशालिटीचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागप्रमुख असताना डॉ. सुधीर गुप्ता आणि हृदयरोग विभागप्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांच्या संयुक्त समितीने सुपरच्या विशेष कार्य अधिकारी यांच्या कक्षात उपचार करण्यात येत होते.

मात्र अलीकडे सामान्य रुग्णांप्रमाणे बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांच्या कक्षातच तपासणी होते. सोमवारी (ता.१८) ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या दरम्यान साईबाबा यांना हृदयरोग विभागात तपासणीसाठी आणले. येथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी पोलिसांची कडेकोट सुरक्षा होती.

आता स्वतंत्र व्यवस्था नाही

साईबाबा यांना तपासण्याची तसेच उपचारासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळीच व्यवस्था करण्यात येत होते. सुपरच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात खाटेपासून तर सर्व यंत्रणा उभारली जात असे. परंतु अलीकडे वेगळा व्यवस्था न करता सामान्य रुग्णांची तपासणी होते, त्याच ठिकाणी साईबाबाची तपासणी होत असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.