Maharashtra Politics : सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली! मिम्स सोशल मिडियावर, कमेंट बॉक्समध्ये हास्याचे फवारे

राजकीय भूकंपावरून सोशल मीडियावर हास्यजत्रा ः मिम्सवरून जनतेचे मनोरंजन
Maharashtra Politics viral memes
Maharashtra Politics viral memessakal
Updated on

नागपूर : दुपारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री व मंत्रीपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडीमुळे दुपारनंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या मिम्सच्या गर्दीने हास्यजत्रा रंगली. समर्थक व विरोधकांसह सामान्य नागरिकांनीही यावर अनेक विनोदी पोस्ट करीत मनोरंजन केले.

अनेकांच्या विनोदी मिम्सने हास्याचे धक्के दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार अर्थमंत्री असल्याने सेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते, असे आरोप केला होता. यामुळेच शिवसेना फोडून भाजपमध्ये गेल्याचेही म्हटले होते.

अर्थात अजित पवार यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे ते शिवसेना फोडताना म्हणाले होते. परंतु आता त्यांना अजित पवार यांच्यासोबत त्यांना घरोबा करावा लागला. यावरून एकाने ‘सासुमुळे वाटणी केली अन् सासूच वाट्याला आली’ असे मिम्स सोशल मिडियावर शेअर केले.

Maharashtra Politics viral memes
Nagpur: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीकडून पत्नीची डोक्यावर हातोडी मारून हत्या

या पोस्टवर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये स्माईली पोस्ट करीत हास्याचे फवारे उडवले. एवढेच नव्हे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानात ‘आम्ही राष्ट्रवादीला कंटाळून बाहेर पडलो होतो, आता काय सांगू’ असे सांगत असल्याचा फोटो शेअर केला.

एकाने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सतत आरोप करीत असलेल्या किरिट सोमय्यांचा कागदपत्रांसह फोटो पोस्ट करीत त्यावर ‘सगळ्यांची होडी करून सोडून देतो’ असे पोस्ट केले आहे. ‘ती पहाट विसरून आता दुपार कायमची आठवणीत राहील’ असे काहींनी पोस्ट केले.

Maharashtra Politics viral memes
Nagpur Accident : नागपूर हादरलं! तलावात बुडून पाच तरुणांना जलसमाधी; मोहगाव झिल्पी येथील घटना

‘वेबसिरिजसारखं झालं राजकारण, दरवर्षी नवीन सिजन येतोय...’ असे काहींनी पोस्ट केले असून यावर हास्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. याशिवाय अनेकांनी अजित पवार, छगन भुजबळ, फडणवीस, शिंदे, अण्णा हजारे यांच्यावर पोस्ट केल्या आहेत.

‘काकांचा गेम प्लान तर नाही’`

पहाटेच्या शपथविधीवर नुकताच शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे आज घडलेल्या राजकीय नाट्यवरून अनेकांनी शरद पवार यांची राजनीती तर नाही, अशी शंका उपस्थित केली.

महेश जोशी यांनी ‘काकांचा गेम प्लान तर नाही’, असा संशय व्यक्त केला. प्रा. विलास डोईफोडे यांनी सर्वच राजकीय शास्त्रज्ञ सिद्धांत, गृहितक, संकल्पनेच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात गुंतल्याचे पोस्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.