देशी गायींसाठी डेटा मॅनेजरची गरज; पशूधन विकास मंडळात पदे रिक्त

देशी गायींसाठी डेटा मॅनेजरची गरज; पशूधन विकास मंडळात पदे रिक्त
Updated on

नागपूर : स्थानिक गायींचे संगोपन व संवर्धनासाठी (Raising and rearing of cows) त्यांच्याशी निगडित विविध माहितीचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात डेटा मॅनेजर किंवा सांख्यिकीची पदे (Vacancies in Maharashtra Livestock Development Board) भरण्यात यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून होत आहे. (Need-a-data-manager-for-Desi-cows)

उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती, पालनपोषण करणे व कृत्रिम रेतनासाठी तो इतर संस्थांना पुरविणे आदी पशुधन विकास मंडळाच्या जबाबदाऱ्या आहेत. मंडळाच्या प्रमुख कार्यालयात स्थानिक भागातील गायींसह इतर जातीच्या गाय, म्हैस येथूनच विविध शासकीय संस्थांना उपलब्ध करून दिले जातात. विशेष म्हणजे जनावरांच्या जातीनिहाय डेटा अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. देशी गायींचा डेटा जर काळजीपूर्वक व्यवस्थित ठेवण्यात आला तर तो निश्चितपणे भविष्यकाळात उपयोगी पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

देशी गायींसाठी डेटा मॅनेजरची गरज; पशूधन विकास मंडळात पदे रिक्त
चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पशुपैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्धोत्पादन व ग्रामीण रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ या स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. मंडळासाठी ५६६ पदांची निर्मितीही करण्यात आली. परंतु, मंडळाचा कारभार सध्या १५० जणच हाकत असून तब्बल ३६६ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी अनेक कामे खोळंबली असून शासनाच्या दुर्लक्षामुळे एकाच व्यक्तीला अनेकांची कामे करावी लागत आहे.

देशी गोवंशाकडे हवे लक्ष

राष्ट्रीय गुरे व महिष पैदास प्रकल्प राज्यामध्ये राबवून पशुपैदाससाठी विशेष तज्ज्ञांची सेवा अधिक कार्यक्षमतेने पुरविणे. राज्यातील देवणी, खिल्लार, गवळाऊ, लालकंधारी, डांगी या मान्यताप्राप्त देशी गोवंशीय जातीच्या तसेच पंढरपुरी व नागपुरी या म्हैसवर्गीय जनावरांचे त्यांच्या मायभूमीत जतन व संवर्धन करणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून संकरित व सुधारित देशी गोपैदास तसेच सुधारित महिष पैदास कार्यक्रमाची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, देशी तसेच स्थानिक गोवंशाकडे जास्त लक्ष देवून कृत्रिम रेतनासह त्यांचे संगोपन व संवर्धन व्हावे अशी मागणी गोपालक करीत आहेत.

‘पशूधन’ची पदनिहाय स्थिती

  • मंजूर पदे ५१६

  • रिक्त पदे ३६६

  • भरलेली पदे १५०

  • (जानेवारी २०२१ पर्यंत)

देशी गायींसाठी डेटा मॅनेजरची गरज; पशूधन विकास मंडळात पदे रिक्त
लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू
रिक्त जागेसंदर्भात शासनाला वेळोवेळी अहवाल पाठवला जात आहे. काही कामे आउटसोर्सिंगद्वारेही करण्यात येत आहेत. देशी गोवंशाचे कृत्रिम रेतन व संबंधित पशृपालकांना शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. रिक्त पदे भरली तर इतर प्रभारामुळे येणारे ताण-तणाव कमी होतील.
- एक अधिकारी

(Need-a-data-manager-for-Desi-cows)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()