नवजात अर्भकाला राष्ट्रीय महामार्गावर बेवारस सोडून आई-वडील पसार

मानव जातीस न शोभणारे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
अर्भक
अर्भकअर्भक
Updated on

देवलापार (जि. नागपूर) : निर्दयी, कठोर हृदय असलेल्या आईने काही तासांच्या आत जन्माला आलेल्या पोटच्या गोळ्याला (Newborn) देवलापार दुर्गा मंदिराजवळील राष्ट्रीय महामार्गावर बेवारस सोडून दिले. मन सुन्न करणारी ही घटना देवलापार पोलिस स्टेशनअंतर्गत काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी जमली होती.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास देवलापार पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दुर्गा मंदिराजवळ अज्ञात आई-वडिलांनी काही तासांपूर्वी जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला (Newborn) बेवारस सोडून पसार झाले. काही लोकांना अर्भक दिसल्यावर पोलिसांना याची माहिती दिली.

अर्भक
‘लडकी हू लड सकती हू’च्या पोस्टर गर्ल भाजपकडून लढणार; काँग्रेसला धक्का

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर डीएनए तपासणीसाठी डॉक्टरांनी अर्भकाचे सॅम्पल घेतले. यापूर्वी सुध्दा २१ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्री निमटोला शिवारात शेतात एक ते दोन दिवसांची चिमुकली आढळून आली होती. तिच्या पण आई-वडिलांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. तीन महिन्यांत दुसरी घटना घडल्याने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

बाळ अनैतिक संबंधातून?

हे बाळ अनैतिक संबंधातून (Immoral relations) झाले असावे किंवा ते स्त्री जातीचे असल्याने बेवारस (Newborn) फेकले असावे अशी चर्चा परिसरात आहे. मृत अर्भकाला बदनामीच्या भीतीने रस्त्यावर ठेवून आई-वडिलांनी पळ काढला असावा, अशी देखील चर्चा परिसरात आहे.

अर्भक
WHO प्रमुख म्हणाले, ...तर जून ते जुलैपर्यंत कोरोनाचा तीव्र टप्पा संपू शकतो

अज्ञात आई-वडिलांवर गुन्हा दाखल

मानव जातीस न शोभणारे कृत्य करणाऱ्या आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नलगुंडवार हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.