NIA Raids in Achalpur Nagpur: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अचलपुरातील एका घरावर छापा घालून एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे अचलपुरात खळबळ उडाली आहे.
एनआयएच्या पथकाने सोमवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास ही कारवाई केली. या छापेमारीची यंत्रणेकडून कामालीची गुप्तता बाळगली होती. यावेळी स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अचलपूरच्या अकबरी चौक परिसरात एनआयएचे पथक रात्री तीन वाजेच्या सुमारास पोहोचले. त्यांनी एका घरात पोहोचून युवकाची चौकशी सुरू केली. या युवकाच्या हालचालींवर राष्ट्रीय तपास यंत्रणा मागील काही महिन्यांपासून लक्ष ठेवून होती. संबंधित युवक नागपूर येथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
एनआयएच्या पथकाने अचलपूर आणि सरमसपुरा पोलिसांचे संरक्षण घेऊन त्यांनी अकबरी चौक परिसरातील एका घरावर छापा घातला. यावेळी पोलिसांच्या सुमारे १५ वाहनांचा ताफा पोहोचला होता. (Latest Maratha News)
छापेमारीबाबत मात्र एनआयएने कोणताही अधिकृत तपशील दिलेला नाही. स्थानिक पोलिसांनीही याबाबत गुप्तता पाळली होती. एनआयएसारखी तपास यंत्रणा अचलपुरात छापेमारी करण्यासाठी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.
अचलपूर शहरात एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सदर कारवाईची माहिती संबंधित तपास यंत्रणाच देऊ शकते.-सुरेंद्र बेलखेडे, पोलिस निरीक्षक, अचलपूर.
अमरावतीत युवकाची बंदद्वार चौकशी
अचलपूर शहरातून ताब्यात घेतलेला युवक एका टेलिग्राम ग्रुपसोबत संलग्न असल्याची बाब पुढे आल्याचे बोलल्या जात आहे. त्यादृष्टीने सदर युवकाला सोमवारी (ता. १८) दुपारी अचलपूर येथून अमरावतीत आणण्यात आले.
ग्रामीण पोलिसांच्या मंथन हॉलमध्ये सदर युवकाची एनआयएच्या पथकाकडून बंदद्वार चौकशी सुरू होती. बाहेर ग्रामीण व शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलण्याचे टाळले. त्यामुळे नेमकी काय चौकशी झाली, यासंदर्भात ग्रामीण पोलिस किंवा एनआयएकडून कोणतीही माहिती देण्यात आले नाही. (Latest Maratha News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.