नागरिकांनो, सरत्या वर्षाचा निरोप अन् नव्या वर्षाचे स्वागत करताना जरा जपून, अन्यथा होणार कारवाई

night curfew till 5 january in nagpur
night curfew till 5 january in nagpur
Updated on

नागपूर : शहरात पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, ३१ डिसेंबर व १ जानेवारीला नागरिक दिवसाला रस्ते तसेच धार्मिक स्थळी गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिरवणुकांवर बंदी घातली आहे. 

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाच्या स्वागतासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत घरीच राहून करण्याचे आवाहन त्यांनी यातून केले. ३१ डिसेंबरला रात्री फटाक्यांची आतषबाजी तसेच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजन आणि मिरवणुकांवर बंदी असल्याचे त्यांनी जाहीर केले. नववर्षाच्या स्वागतानिमित्त शहरात फुटाळा, अंबाझरी, धरमपेठ, गांधीसागर तलाव, इतवारी, महाल आदी ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षीचेच चित्र आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता या ठिकाणांसह व अन्य ठिकाणीही नागरिकांनी दिवसालाही गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे, ६० वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांचे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ३१ डिसेंबरलाही सायंकाळी तलावालगत, उद्यान, रस्त्यावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे नमूद करीत त्यांनी तरुणाईच्या उत्साहावर विरजन घातले. त्यामुळे ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारीला दिवसालाही नागरिकांना गर्दी करता येणार नाही. सरत्या वर्षाला निरोप तसेच नववर्षाचे स्वागत करताना फिजिकल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायजर वापर आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

कारवाईचा इशारा - 
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर व १ जानेवारीला दिवसालाही गर्दी करणे महागात पडण्याची शक्यता आहे. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी 'हरित शपथ' - 
'माझी वसुंधरा अभियाना' अंतर्गत १ जानेवारी २०२१ रोजी मनपातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'हरित शपथ' देण्यात येणार आहेत. या दिवशी सर्व अधिकारी, कर्मचारी सायकलने कार्यालयात येणार आहेत. झोनमध्येही शपथ देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.