निमगडे हत्याकांड : पाच कोटींची सुपारी देणारा कोण? राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याची शक्यता

Nimgade massacre Who gave betel nut worth Rs 5 crore
Nimgade massacre Who gave betel nut worth Rs 5 crore
Updated on

नागपूर : ऑटोचालकाचा कुख्यात गॅंगस्टर बनलेल्या रणजित सफेलकरला आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांचे हत्या करण्यासाठी पाच कोटींची सुपारी देण्यात आली होती. मात्र, तो सुपारी देणारा कोण? हे सहस्य अजुनही कायम आहे. राजकीय क्षेत्रातील काही बड्या धेंडांवर संशयाची सुई आहे. सुपारी देणाऱ्याचे नाव समोर आल्यास राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धा रोडवरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाच एकर जागेवर बिल्डर्स, व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तीसह अनेकांची नजर होती. विमानतळाला लागून असलेल्या जागेवर फ्लॅट स्किम, आलिशान हॉटेल, प्रशस्त बंगला किंवा कंपनी उभारण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते.

मात्र, ती जागा बळकावण्यात एकनाथ निमगडे हे एकमेव अडथळा होते. त्यामुळे ती जमीन बळकावण्यासाठी मोठी लॉबी कामाला लागली होती. त्यामध्ये विक्की आणि महेश, कुमार यांच्या नावांची ओरोळी उठली होती. त्यांनी ‘बीग बॉस’ यांच्या परवानगीने काही ‘गेम प्लान’ आखले. त्यानुसारच रणजीत सफेलकरला ‘हायर’ करण्यात आले होते, अशी चर्चा शहरभर आहे. 

पाच कोटींची सुपारीसह रणजितला ‘प्रोटेक्शन’ देण्याचे आश्‍वासन बड्या राजकीय व्यक्तींनी दिले होते. त्यामुळेच रणजितने कालू हाटे, भरत हाटे यांच्या माध्यमातून एकनाथ निमगडे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार राजकीय क्षेत्रातील बडा व्यक्ती असल्याची चर्चा सध्या शहरात आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेने रणजितला मनीष श्रीवास हत्याकांडात अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने निमगडे हत्याकांडासाठी पाच कोटींची सुपारी देणाऱ्याचे नाव सांगितल्यास राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका गायकाची चौकशी

मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखेने एका गायकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याने स्वतःची कार रणजित सफेलरकराल दिली होती. गेल्या नऊ वर्षांपूर्वी त्या गायकाने रणजितला कमतरी बाजार येथे जाण्यासाठी कार दिली होती. पोलिसांनी चार कार जप्त केल्या असून एक यवतमाळ जिल्ह्यातील पाढरकवड्यातून जप्त केली. ती कार मोहनिशची असल्याचे बोलले जाते. त्याचाही खून झाला होता. पोलिसांनी काठी आणि कन्हानमधील काहींना चौकशी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.