Nagpur News : नागपूरकर ‘निर्मिती’च्या दिग्दर्शनाला लघुपट पुरस्काराचे कोंदण

मुंबई एंटरटेंमेंटमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे यावर्षीची ‘उत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ पारितोषिक युवा दिग्दर्शिका निर्मिती जीवनतारे यांना घोषित करण्यात आले आहे.
nirmiti jivantare
nirmiti jivantaresakal
Updated on

नागपूर - मुंबई एंटरटेंमेंटमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे यावर्षीची ‘उत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ पारितोषिक युवा दिग्दर्शिका निर्मिती जीवनतारे यांना घोषित करण्यात आले आहे. उपराजधानीत तयार झालेल्या ‘आबरू’ या लघुपटासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळविणारी निर्मिती ही विदर्भातील पहिलीच दिग्दर्शक ठरली आहे.

२४ वर्षीय निर्मितीला नाट्यकलेचे बाळकडू घरातूनच मिळाले. नृत्यकलेत अनेक पारितोषिक मिळवल्यानंतर अवघ्या बारा वर्षाची असताना अशोक जांभूळकर दिग्दर्शित ‘महासम्राट अशोक’ महानाट्यात मध्यवर्ती भूमिकेत ती होती. याचा प्रयोग कर्नाटकातील गुलबर्गा येथे सादर झाला होता.

यानंतर व्हीएमव्ही कॉलेजमध्ये नाट्यकलेतील ‘थिएटर अँड आर्ट क्रॉफ्ट’ हा पदवी अभ्यासक्रम करताना प्रसिद्ध लेखक बादल सरकार यांच्या ‘सुरज का सातवा घोडा’, नागपुरातील प्रसिद्ध नाटककार पराग घोंगे यांच्या ‘मानसीचा शिल्पकार तो’, ‘स्मशान’, ‘क्रांतिनायक’ या नाटकातून तिने अभिनयाची छाप सोडली. तर, ‘गुलसिता’ या लघू चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून निर्मितीने काम केले आहे.

प्रमोद काळबांडे लिखित ‘संविधान’ या एकपात्री नाट्याचे अनेक प्रयोग केले. ‘तू आस पास’ या गीतावर अल्बम तयार केले आहे. निर्मितीने केरळ येथील एल. व्ही. प्रसाद फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स केला. यात दिग्दर्शनाचे स्पेशलायझेशन केले. यादरम्यान ‘आबरु’ हा लघुपट पूर्ण केला.

उत्कृष्ट महिला दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची बाब आहे. यामुळे, केवळ माझा आत्मविश्वास वाढणार असून नागपूर व विदर्भातील नाट्यक्षेत्रातील कलावंतांना विशेषतः तरुणांना प्रोत्साहन मिळणार आहे.

- निर्मिती जीवनतारे, दिग्दर्शिका, नागपूर

पुण्यातील महोत्सवासाठी निवड

मुंबई एंटरटेंमेंटमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे २२ जूनला मुंबईत होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते निर्मितीला सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘आबरू’ या लघुपटाची निवड झाली असून, सात जूनला पुणे येथे या लघुपटाचे सादरीकरण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.