नागपूरकरांनो! आता 'आरटीओ'पासून थेट शहराबाहेर पडता येणार, सिग्नलचा त्रासही होणार कमी

nitin gadkari announces rto to university campus flyover in nagpur
nitin gadkari announces rto to university campus flyover in nagpur
Updated on

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील २८०० कोटींच्या महामार्गांना मंजुरी दिली. यात नागपूरचा विद्यापीठ कॅम्पस परिसर ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलाचाही समावेश आहे. त्यामुळे हे अंतर लवकर पार होण्याची शक्यता आहे.

एकूण ४७८.८३ कोटी खर्च करून हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलाबाबात गडकरी यांनी वंजारीनगर रस्त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी घोषणा केली होती. आरटीओ ते विद्यापीठ कॅम्पस परिसर हा वाडी आणि एमआयडीसी जाणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा उड्डाणपूल चारपदरी राहणार आहे. अमरावती रोडने जाताना चौकांमधील सिग्नलवर वारंवार थांबावे लागते. उड्डाणपुलामुळे थेट शहराबाहेर विना अडथळा पडता येणार आहे. गडकरी यांच्यामुळे नागपूर शहरात आणखी एका उड्डाणपुलाची भर पडणार आहे. 

याशिवाय तिरोडा गोंदिया हा २८ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील महामार्गालाही मंत्रालयाने मंजुरी दिली. २८८.१३ कोटींचा हा महामार्ग असेल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ वर मराठवाड्यातील परळी ते गंगाखेड या मार्गाचे उच्च गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून २४४.४४ कोटी रुपये यासाठी खर्च येईल. आमगाव गोंदिया भागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील महामार्गही मंजूर करण्यात आला. २३९.२४ कोटी रुपये खर्च या महामार्गाला येणार आहे. नांदेड जवळील येसगी गावाजवळ मंजिरा नदीवरील पुलाच्या कामालाही अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली आहे. १८८ कोटींचे हे काम आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()