Nitin Gadkari Interview : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोर लावला जात आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. यापैकी नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. गडकरी यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे.
दरम्यान देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून ओळख असलेले नितीन गडकरी हे त्यांच्या विकासकामाच्या धडाक्यामुळे प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सकाळ वृत्तसमुहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांच्यासोबत जेवण, रस्ते, विकासकामे, उद्योजकता आणि राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.
या दिलखुलास मुलाखतीमध्ये, नितीन गडकरी यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मते व्यक्त केली आहेत. आरोग्य आणि आहाराच्या सवयी याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, मी लहानपणापासूनच 'फूडी' आहे, पण आता मी स्वतःवर निर्बंध घालून घेतले आहेत. मी ४५ किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळं आता मी कमी खातो. दीड तास प्राणायम, व्यायम करतो. मी ५३-५४ वर्षांपर्यंत पूर्ण अनऑर्गनाइज आणि बेशिस्त आयुष्य जगलो, पण आता पहिलं प्राधन्य हेल्थला , दुसरी इमानदारीने कमवेलेल्या वेल्थला आणि तिसरं प्राधान्य आपल्या कामाला देतो असेही गडकरी यावेळी म्हणाले. यासोबतच गडकरी यांनी त्यांच्या इतर आवडीनिवडींविषयी देखील माहिती दिली.
यासोबतच निवडणुकींच्या काळात होणाऱ्या राजकारणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले की, मला काही चिंता नाही. मी गमतीने म्हणतोही की निवडणून नाही आला तर का माणूस मरतो का? माझा आत्मा काही खुर्चीत अडकलेला नाहीये. मी असाच चालेन, जे पटलं ते करीन. माझी दिशा स्पष्ट आहे. जो मत देईल त्याचं भलं, नाही देईल त्यांच देखील भलं. त्यामुळं काही गोष्टीत माझ्या कल्पना स्पष्ट आहेत असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.