Nitin Gadkari : समाजात आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी सीएंची ;नितीन गडकरी,‘नॅशनल सीए कॉन्फरन्स’मध्ये साधला संवाद

देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर आर्थिक परिवर्तन आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग, कृषी, सेवा यासारख्या प्रत्येक क्षेत्रासह समाजाला आर्थिक व्हिजन ठेवून पुढे जावे लागेल.
Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal
Updated on

नागपूर : देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायचे असेल तर आर्थिक परिवर्तन आवश्यक आहे. त्यासाठी उद्योग, कृषी, सेवा यासारख्या प्रत्येक क्षेत्रासह समाजाला आर्थिक व्हिजन ठेवून पुढे जावे लागेल. हे व्हीजन देण्याची आणि समाजाला आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी चार्टर्ड अकाऊंटन्ट्सची (सीए) आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ सीए स्टुडंट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ट शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शहा, नागपूर शाखेचे अध्यक्ष अक्षय गुल्हाने, तृप्ती भट्टड, पश्चिम विभागाचे सदस्य अभिजित केळकर, दिनेश राठी उपस्थिती होते. अध्ययन, श्रम, ज्ञान आणि गुणवत्तेच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट होता येते.

केवळ जीएसटी आणि प्राप्तिकरापुरते सीएंचे महत्त्व नाही. समाजाला आर्थिक नियोजन देण्याचे काम ते करतात, असेही गडकरी म्हणाले. ‘देशाच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या आर्थिक विकासाचा थेट संबंध सीएंसोबत आहे. उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या प्रगतीच्या जोरावर देशाचा आर्थिक विकासदर वाढविण्याची आणि एकूणच व्यवस्थेला गती देण्याची सीएंवर मोठी जबाबदारी आहे,’ असेही गडकरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com