Nitin Gadkari : गडकरींनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना का दिली होती गोळ्या घालण्याची धमकी? स्वतःच सांगितला किस्सा

Nitin Gadkari On roads in Melghat : मेळघाटातील रोडबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक खास किस्सा सांगितला आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari
Updated on

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गडकरी हे त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. दरम्यान गडकरीनी विदर्भातील मेळघाटमध्ये रस्ते बांधताना आलेल्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी वापरलेली शक्कल याबद्दलचा एक खास किस्सा सांगितला आहे. इथे रस्ते व्हावेत यासाठी गडकरी यांनी शोधलेल्या मार्गाची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

आपल्या खास शैलीतून अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. मेळघातमध्ये रस्ते होत नसताना मनोहर जोशीच्या काळात त्यांनी कशा पद्धतीने रस्ते बांधून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावलं, याचा किस्सा त्यांनी गमतीदारपणे सांगितला आहे. यासोबतच त्यानंतर संपूर्ण मेळघाटमध्ये रस्ते झाल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले.

गडकरी यांनी सांगितले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मेळघाटमध्ये फॉरेस्ट अधिकारी रस्ते बांधण्यास परवानगी देत नव्हते.. त्यांना तेव्हा त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना गडकरी यांनी मी युवा असताना नक्षलाईट मोमेंटमध्ये गेलो होतो. आता जर पुन्हा गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या शब्दात तंबी दिल्याची आठवण सांगितली आहे. त्यानंतर मेळघाटचे रस्ते झाल्याचा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. ते नागपुरात अरुण बोंबीलवार फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

Nitin Gadkari
Viral Video: मुंबईच्या वडापाव विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून कॉर्पोरेट लोकांना बसेल धक्का; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

सरकार म्हणजे काय?

तसेच सरकार मध्ये चांगलं आणि वाईट काय याची व्याख्या सांगताना गडकरी म्हणाले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याचं नाव सरकार आहे. कारण सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली ती फाईल वर जात नाही असाही किस्सा त्यांनी बोलताना सांगितला.

Nitin Gadkari
Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.