संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

nitin raut refused to talk on sanjay rathod case in nagpur
nitin raut refused to talk on sanjay rathod case in nagpur
Updated on

नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप आणि पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन याबाबत प्रश्न विचारला. मात्र, नितीन राऊतांनी बोलण्याचे टाळले आणि थेट सभागृहातून तडक उठून  गेले. तसेच मुंबईमध्ये देखील संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता सेनेच्या एका मोठ्या नेत्याने हात जोडले. त्यामुळे आता सत्ता पक्षातील नेते राठोडांबाबत बोलण्याचा का टाळत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. 

नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. झपाट्याने पसरणाऱ्या या नव्या स्ट्रेनपासून सावध राहा. तसेच रुग्णसंख्या कमी करण्यासाठी चाचण्या आधीच्या तुलनेत तिप्पट वाढविल्या असून सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. त्यानंतर नागपुरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विरोधकांवरही टीका केली. सरकार नीट चालविण्यासाठी विरोधकांची गरज असतेच. विरोधकच नसले तर सरकारचा गाडा व्यवस्थित चालणार नाही आणि सध्याचे विरोधक त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत. शेवटी काय तर, निंदकाचे घर असावे शेजारी, असे ते म्हणाले. शेवटी पत्रकारांनी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी चुप्पी साधली. तसेच सभागृहातून बाहेर पडले. 

१ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांकडून गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. तसे विरोधकांकडून बोललेही जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील संजय राठोडांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मात्र याबद्दल बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री राठोडांचा राजीनामा घेणार का, हे येणारा काळ ठरवेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.