वाडी (जि. नागपूर): उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व नागपूर शहराचे उपनगर असलेल्या वाडीची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. वाडी, दत्तवाडी, दवलामेटी, दृगधामना या सर्व एकमेकांना जोडून असलेल्या परिसरात येथील जनतेच्या आरोग्याशी मात्र खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. येथील आरोग्यसेवेचे ‘तीन तेरा’ झाले असल्याचे दै.‘सकाळ’ चमूच्या निरिक्षणात पुढे आले आहे. त्यांनी या परिसरात फिरून जनतेशी संवाद साधून येथील तकलादू आरोग्यसुविधांचा लेखाजोखा मांडला आहे.
वाडी न.प.क्षेत्रात कोरोनाचा वाढता संसर्ग स्थानिक प्रशासनासह नागरिकांत चिंतेचा दिसून येत आहे. वाडी न.प.चा आरोग्य विभाग मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात सतत कोरोना रुग्ण व उपचारात प्रयत्नशील आहे. परंतू परिसरातील बाधितांची संख्या जवळपास ५५० च्या वर गेली असून मृतांची संख्या 3 दिवसापूर्वी १६ होती, ती आता२१ वर पोहचली आहे. गुरुवारी धम्मकीर्ती नगर येथील निवासी व आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी ८०वर्षीय रामदास शेंडे हे तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
मात्र घरीच रात्री प्रकृती अत्यावस्थ होऊन गुरुवारी सकाळी त्यांचे घरीच निधन झाले. वाडीत घरीच निधन होणारे हे पहिले प्रकरण असल्याने धम्मकीर्ती नगरात खळबळ उडाली. आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे यांनी गंभीरता ओळखून त्वरित विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करून सामाजिक समता मंचाचे पदाधिकारी, नगरसेवक नरेंद्र मेंढे व शेंडे कुटुंबीयांच्या सहकार्याने अंबाझरी घाटावर अंत्यविधीसाठी रवाना केला. शुक्रवारी दुपारी डॉ.आंबेडकर नगरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोनटक्के यांचेही कोरोनाने निधन झाल्याची वार्ता परिसरात पसरताच शोक निर्माण झाला.
मृतांची संख्या वाडी न.प. क्षेत्रात२१ वर पोहचली. गत दोन महिन्यापासून आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन हेमके यांच्या मार्गदर्शनात डॉ.सोनाली बाके, डॉ.सुषमा धुर्वे, सहाय्यक अनुराग पाटील आदींच्या चमूने आतापर्यंत३८०० पेक्षा जास्त कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. १३५ घरांना सील करण्यात आले असून ८०टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची घर वापसी झाली आहे. सध्या वाडी न.प.क्षेत्रात२३८ एवढे क्रियाशील रुग्ण असल्याचे समजते.
परिस्थितीचे गांभीर्य बघता नागपूर जिल्हा प्रशासनाने ७ सप्टेंबर पासून वाडी पो.स्टे.समोरिल नक्षत्र हॉस्पिटलला कोविद-१९ रुग्णालय केंद्र म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.आर.मार्कन्डेय यांनी दिली आहे. येथे४६ बेडची मान्यता दिली असून अगदी कमी वेळात कुशल डॉक्टर्स, नर्सिंग व अन्य स्टाफच्या नियुक्तीसह कोविद संबंधित आयसीयू आदी सुविधा निर्माण करून ३०आयसीयू बेडची वैद्यकीय सुविधा तयार करण्यात आली आहे.
शासकीय नियमानुसार उपचार शुल्क व अन्य आवश्यक शुल्कावर आधारित मंगळवार पासून सुरू झाली आहे. परंतू वाडी परिसरातील आकस्मिक कोरोना रुग्णांना नागपूरात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. खासगीचा उपचार खर्च सामान्यांना परवडणारा नसल्याने वाडी परिसरात ही एखादे आकस्मिक उपचार केंद्र निर्मितीची गरज व्यक्त केली जात आहे. पण नागरिक ही अडचण सांगणार कोणत्या नेत्याजवळ, हा प्रश्न दिसून येत आहे. तर कोरोना प्रसाराला खंडीत करण्यासाठी वाडीतही जनता कर्फ्यु लावावा काय? या मागणीला जोर धरू लागला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.