Wardha Traffic Update : वर्धा मार्गावर आजपासून मॉरिस कॉलेज टी-पॉंईन्ट ते अजनी चौकापर्यंत ‘नो राईट टर्न’

शहरातील वाहतुकीच्या समस्या गेल्या काही वर्षांमध्ये अधिक बिकट झालेल्या आहेत. त्यात वाहतुकीची कोंडी वाहतूक विभागाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.
वर्धा मार्गावर आजपासून ‘नो राईट टर्न’
वर्धा मार्गावर आजपासून ‘नो राईट टर्न’sakal
Updated on

नागपूर : शहरातील वाहतुकीच्या समस्या गेल्या काही वर्षांमध्ये अधिक बिकट झालेल्या आहेत. त्यात वाहतुकीची कोंडी वाहतूक विभागाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या दमाचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी पहिला प्रयोग वर्धा मार्गावर करण्याची योजना आखली असून, उद्या सोमवारपासून (ता.२३) रविवारपर्यंत (ता.२८) मॉरिस कॉलेज टी-पॉंईन्ट ते अजनी चौकापर्यंत कुणालाही उजवे वळण घेता येणार नाही.

शहरातील बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यात वर्धा मार्गावर मॉरीस कॉलेज टी पॉईन्ट ते अजनी चौकातून पुलावर चढतेवेळी आणि उतरतेवेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. साधारणतः कृपलानी चौकात अजनी आणि दीक्षाभूमीकडून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतुकीच्या कोंडीची दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येते.

त्यातून वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारताच पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही कोंडी फोडण्यासाठी सात दिवस ‘ट्रायल’ घेण्याच्या उद्देशाने मॉरिस कॉलेज टी पॉईन्ट ते अजनी चौकादरम्यान उजवे वळण बंद केले आहे. त्यामुळे ही कोंडी फुटणार की कायम राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

फिरून जाण्याने मनस्ताप वाढणार?

दीक्षाभूमीते माताकचेरी येथून अजनी आणि दक्षिण आणि पूर्व नागपूरकडे जाण्यासाठी कृपलानी चौकाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या चौकातून उजवे वळण बंद केल्यास ती वाहतूक सरळ रामदासपेठ वा इतर रस्त्यावर येईल.

रामदासपेठेतील सेंट्रल बाजार मार्गावर यापूर्वीच वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. याशिवाय येथून वर्धा मार्गाकडे जाण्यासाठी नीरीसारखा छोट्या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा फेरा नागरिकांना परवडणारा ठरेल काय? याबाबत शंका आहे.

असे असतील बदल

  • मॉरीस कॉलेज टी पॉईन्टकडे जाणारी वाहतूक रहाटे कॉलनी चौक ते कृपलानी चौकाकडून अजनी चौकापर्यंत उजवे वळण राहणार नाही.

  • सर्व वाहने अजनी चौक ते मॉरिस टी पॉईन्ट कुठेही उजवे वळण न घेता सरळ जातील.

  • माता कचेरीकडून कृपलानी चौकाकडे जाणारी वाहतूक निरी टी पॉईन्ट- अजनी नाका व युटर्न घेऊन मनिषनगर उड्डाणपुल आणि काचीपुरा चौकाकडे वळविण्यात येईल.

  • अजनी उड्डानपुल व कॉंग्रेसनगर टी पॉईन्ट कडून येणारी, कृपलानी ते अजनी नाका मार्गे युटर्न घेऊन जातील.

  • रहाटे चौक ते अजनी नाका पर्यंत तसेच अजनी नाका ते रहाटे कॉलनीपर्यंत संपूर्ण सिग्नल ब्लिंकर मोडवर ठेऊन दुतर्फा वाहतूक उजवे वळण न घेता सरळ जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.