'मशीन आहे हो, पण टेक्‍निशियन नाही'; आरोग्य विभागाचा कारभार; रुग्णांचे हाल

'मशीन आहे हो, पण टेक्‍निशियन नाही'; आरोग्य विभागाचा कारभार; रुग्णांचे हाल
Updated on

अचलपूर ः सरकारी रुग्णालयात (Government Hospitals) तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे योग्य निदान व्हावे, यासाठी एक्‍स-रे मशीन (X-Ray Machine) उपलब्ध करून देण्यात आली. मात्र एक्‍स-रे मशीन हाताळणारे टेक्‍निशियन (Technicians) मागील काही महिन्यांपासून येत नसल्यामुळे एक्‍स-रे विभाग बंद पडला आहे. परिणामी रुग्णांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा ( Chikhaldara) येथील ग्रामीण रुग्णालयात घडत असल्याचे समोर आले आहे. (No x ray machine technician available in Chikhaldara rural hospital)

'मशीन आहे हो, पण टेक्‍निशियन नाही'; आरोग्य विभागाचा कारभार; रुग्णांचे हाल
विदर्भातील ऑक्सिजन प्लांटसाठी उद्योग मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणार ७० टक्के अनुदान

विशेष म्हणजे, याप्रकारामुळे मेळघाटच्या विविध गावांतून चिखलदरा येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असून रुग्णांवर खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. येथील वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने रुग्णांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

मेळघाटच्या चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल कॉम्प्युटराइज एक्‍स-रे मशीन आहे. परंतु येथील ही सुविधा मागील काही महिन्यांपासून टेक्‍निशियनअभावी बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांना केवळ एक्‍स-रे साठी खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. पर्यायी गरीब रुग्णांना आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील विविध आजारांमध्ये रुग्णांचे निदान करण्यासाठी एक्‍स-रे काढावे लागतात. यामध्ये काही रस्ता अपघाताचेही रुग्ण असतात. अशा रुग्णांना तर एक्‍स-रे काढणे अती आवश्‍यक असते.

आता तेवढ्यासाठी या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र सुविधा उपलब्ध असूनही ती रुग्णांच्या कामी येत नसेल तर ती सुविधा कोणत्या कामाची? असा प्रश्‍न विचारला जात आहे. या समस्येकडे रुग्णालयांच्या प्रशासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. करिता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रुग्णालय प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करून ही गैरसोय दूर करण्याची मागणी रुग्णांमधून होत आहे.

'मशीन आहे हो, पण टेक्‍निशियन नाही'; आरोग्य विभागाचा कारभार; रुग्णांचे हाल
जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावावर नागरिकांची झुंबड; कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता

मागील एक वर्षापासून टेक्‍निशियनअभावी रुग्णालयातील एक्‍स-रे विभागाची सेवा बंद आहे. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. -डॉ. संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चिखलदरा.

(No x ray machine technician available in Chikhaldara rural hospital)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()