नागपूर - उत्तर नागपूरमध्ये दहा वर्षानंतर उत्तरचे गणित सोडविण्यासाठी कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत आणि भाजपचे डॉ. मिलिंद माने यांच्यात खरी लढत होणार आहे. यावेळी कॉंग्रेससमोर बसप उमेदवार मनोज सांगोळे यांचे आव्हान आहे. .येथील वॉर्डात पंधरा वर्षांपासून नगरसेवक पदावर आरूढ होत विकासकामे करणारे अशी ओळख मनोज सांगोळे यांची आहे. मात्र आमदार होण्यासाठी ते बसपच्या अंबारीवर स्वार झाले.दोन दिवसांपूर्वी बसपचे बुद्धम राऊत यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही पक्षाने एबी फार्म दिले. मात्र अचानक बसपने बुद्धम राऊत ऐवजी मनोज सांगोळे यांना एबी फार्म मिळाले असा दावा त्यांनी केला. यामुळे बसपचे दोन अर्ज दाखल होण्याची जोरदार चर्चा उत्तरच्या राजकीय वर्तुळात आहे.....तर होणार २०१४ ची पुनरावृत्तीभाजपकडून २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने रिंगणात होते. तर कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत उमेदवार होते. दोघांमध्ये थेट लढत होती, मात्र बसपच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव पडला आणि उमेदवार किशोर गजभिये यांच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी मतांचा जोगवा पडला. यामुळे दुसऱ्या क्रमांकावर ते होते.तर कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र २०१९ मध्ये थेट लढतीमध्ये नितीन राऊत यांनी ८६ हजार ८२१ मते घेत २० हजारांच्या फरकाने निवडून आले. २०२४ मध्ये मनोज सांगोळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने २०१४ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे..२०१४ च्या निवडणुकीतील स्थितीउमेदवार - मतेडॉ. मिलिंद माने - ६८९०५किशोर गजभिये - ५५१८७डॉ.नितीन राऊत - ५००४२.मी मतदार बोलतोय... पाठवा आपला अजेंडाविधानसभा निवडणुकीत मतदारराजाला आपल्या पसंतीचा आमदार निवडण्याची संधी चालून आली आहे. यासाठी तुमच्या मनातील आमदार कसा असावा, त्याने तुमच्या भागासाठी, समाजासाठी काय करावे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे आम्हाला कळवता येणार आहे. यासाठी तुमचा मतदारसंघ, आमदारकडून अपेक्षा, प्रतिक्रिया आम्हाला ९०२२२६६५६९ या क्रमांकावर पाठवा. निवडक प्रतिक्रिया प्रकाशित करू.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.