नागपूर ः मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी जाहीर केली असतानाही नागपूर शहरातील वर्दळ कमी होत नसल्याने महापालिकेने सम आणि विषम फॉम्युल्याचे आदेश काढण्यात आले आहे. प्रामुख्याने मोठी बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणी सम-विषय लागू करण्यात आले असून महात्मा फुले बाजी भाजारातील गर्दी टाळण्यासाठी वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. यातून जीवनाश्यक दुकानांना वगळण्यात आले आहेत.
दोन दिवसांपासून नागपूरमध्ये लॉकाडाऊन सुरू आहे. असे असतानाही शहरातील वर्दळ कमी झालेली नाही. महापालिका आणि पोलिस काहीच दक्षता घेत नसल्याचा आरोप होत आहे. महापालिका करोनाला रोखण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आज आदेश काढला.
असे राहतील सम-विषम
सतरंजीपुरा झोन
मारवाठी चौक ते जुना मोटररस्टँँड चौक
उत्तर व पूर्व दिशेकडील दुने सम तारखेस,
दक्षिण व पश्चिम दिशेकडील दुकाने विषम तारखेस
धरमपेठ झोन
रामनगर,लक्ष्मीभुवन, गोकुळपेठ मार्केट
दक्षिण व पूर्व दिशेकडील दुकाने सम तारखेस
दक्षिण व पश्चिम दिशेकडील दुकाने विषय तारखेस
आसीनगर झोन
इंदोरा चौक ते पाचपावली
उत्तर व पूर्व दिशेकडील दुकाने सम तारखेस
दक्षिण व पश्चिमेकडील दुकाने विषम तारखेस
मंगळवारी झोन
गोलबाजार व परिसर
उत्तर व पूर्व दिशेकडील दुकाने सम तारखेस
दक्षिण व पश्चिमेकडील दुकाने विषम तारखेस
महात्मा फुले मार्केट
घाऊक भाजपाला विक्रेते ः सकाळी चार ते सकाळी आठ
आलू-कांदा दुकाने ः सकाळी नऊ ते दुपारी १२ पर्यंत
भाजीपाला वगळता अत्यावश्य सेवेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.