Nursing Entrance Exam : नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी शिक्षक वेठीस; १५ तासांपूर्वी उपस्थित राहण्यासाठी पत्र

परीक्षेला १५ तास शिल्लक असताना मंगळवारी डॉक्टर, दंत चिकत्सकांपासून तर नर्सिगमधील ट्यूटर यांच्यावर तुघलकी निर्णय लादून निरीक्षक म्हणून हजर राहण्याचे पत्र जारी केले.
Nursing Entrance Exam
Nursing Entrance Examsakal
Updated on

नागपूर - ऑग्झिलरी नर्स मिडवाईफरी (एएनएम), जनरल नर्सिंग मिडवाइफरी (जीएनएम), बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशासाठी (सीईटी) सामाईक चाळणी परीक्षेचे आयोजन मंगळवारी (ता.२८) रोजी करण्यात आले. मात्र यासंदर्भात राज्य सीईटी कक्ष आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने कोणतेही पूर्व नियोजन केले नाही.

परीक्षेला १५ तास शिल्लक असताना मंगळवारी डॉक्टर, दंत चिकत्सकांपासून तर नर्सिगमधील ट्यूटर यांच्यावर तुघलकी निर्णय लादून निरीक्षक म्हणून हजर राहण्याचे पत्र जारी केले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचा हा सावळा गोंधळ असून ऐनवेळी निरीक्षकांच्या (वेन्यू ऑफिसर) नियुक्तीसाठी वैद्यकीय शिक्षकांना वेळेवर वेठीस धरले आहे.

राज्यात ऑग्झिलरी नर्स मिडवाईफरी (एएनएम), जनरल नर्सिंग मिडवाइफरी (जीएनएम), बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी राज्यातील १२५ केंद्रांवर सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २८ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र या १२५ केंद्रावर परीक्षेदरम्यान निरीक्षक नियुक्त करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने आठ दिवसांपूर्वी बैठकीचे आयोजन करण्याची गरज होती.

मात्र कोणतेही नियोजन न करता बी.एस्सी. नर्सिंग , शासकीय दंत महाविद्यालय तसेच मेडिकल प्रशासनाकडून परीक्षा मंगळवारी असताना एक दिवसापूर्वी सोमवार २७ मे रोजी पत्र पाठवून महाविद्यालयांकडून निरीक्षक नियुक्तीसाठी डॉक्टर, दंत चिकित्सक तसेच नर्सिंगमधील वैद्यकीय शिक्षक, ट्यूटर यांची नावे मागवली व मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सेंटरवर उपस्थित राहण्याचे निर्देश जारी केले. यासंदर्भात वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

पत्रात परीक्षेची तारीख चुकीची

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने नर्सिंग अभ्यासक्रमासाठी सामाईक चाळणी परीक्षा २८ मे २०२४ रोजी आयोजित केली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने महाविद्यालयांना २७ मे रोजी जारी केलेल्या पत्रात नर्सिंक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेची तारीख २८ एप्रिल २०२४ अशी टाकली आहे. याचा अर्थ २८ एप्रिल रोजी ही परीक्षा झाली की काय? असा संभ्रम अनेक डॉक्टर, दंत चिकित्सक तसेच इतरांचाही झाला आहे.

अनेक जण रजेवर..

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने स्थानिक बी.एस्सी. नर्सिंग तसेच शासकीय दंत महाविद्याल, मेडिकल प्रशासनाकडून डॉक्टर, पाठ्यनिर्देशक तसेच इतरांची नावे मागवली. यानंतर सोमवारी (ता.२७) सायंकाळी पाच वाजता सर्वांना केंद्रावर निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्यासाठी पत्र जारी केले. मात्र काही डॉक्टर वैद्यकीय रजेवर होते. कोणी उन्हाळी सुट्यांवर आहेत. शहराच्या बाहेर असणारे डॉक्टर कसे उपस्थित राहतील याच विचारही वैद्यकीय शिक्षण विभागाने केला नाही. असा सावळागोंधळ वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.