Nagpur News: एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजपचे आमदार नितेश राणे यांना भोवले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी जाहीर सभेला संबोधित केले होते.