Old Pension: राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या हालचाली? अजित पवारांनी सभागृहात स्पष्ट सांगितलं

नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.
 Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. यापार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिवेनशात चर्चेसाठी आला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे सुतोवाच केले आहेत. यासाठी त्यांनी निश्चित वेळही सांगितली आहे. (old Pension scheme may come back in Maharashtra Ajit Pawar made it clear in Vidhan Parishad during winter session)

 Ajit Pawar
Uddhav Thackeray : ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, "मी मुख्यमंत्री असतो तर..."

अजित पवार सभागृहात काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुन्या पेन्शनवर निर्णय होणार असल्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. विधानपरिषदेत चर्चेदरम्यान त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. पवार म्हणाले, "हे सरकार सकारात्मक आहे. तो निर्णय येईपर्यंत ते पण आपण बघू आणि हे पण आपण बघू. (Ajit Pawar's thread)

कपिल पाटील तुम्हाला सांगतो, हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही चिंता करु नका. त्यानंतर सहा महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला अश्वस्थ करु इच्छितो की विधानसभा निवडणूक लागायच्या आधी या जुन्या पेन्शनच्या संदर्भात हे सरकार निश्चितपणे निर्णय घेईल" (Marathi Tajya Batmya)

 Ajit Pawar
भुजबळांकडे पेढे खायला अन् प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार; उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

समितीचा अहवाल सरकारला सादर

अजित पवारांनी सविस्तर माहिती देताना ट्विट केलं की, "जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याचबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे. ती माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणूकपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मी देतो"

नागपुरात जुन्या पेन्शनसाठी आंदोलन

जुन्या पेन्शन योजनेसाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकिय नोकरदार वर्गानं आंदोलन पुकारलं. या मागणीसाठी बऱ्याच दिवसांपासून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत.

यानंतर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाच्या इतर काही आमदारांनी देखील आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत त्यांना संबोधितही केलं. ते म्हणाले जर सध्या मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर ही आंदोलन करण्याची वेळच आली नसती.(Agitation for old age pension in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.