नागपूर : ओमिक्रॉनसह कोरोनाचे संकट

सहा वर्षीय चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; तर १३३ जण कोरोनाच्या विळख्यात
omicron With corona of the crisis
omicron With corona of the crisis sakal
Updated on

नागपूर : नागपूर जिल्‍ह्यावर (Nagpur District) ओमिक्रॉन व्हेरियंटसह (Omicron variant) कोरोनाचे दुहेरी संकट घोंगावत आहे. कोरोनाच्या (Corona)धास्तीत असताना ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सहा वर्षांच्या चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉनने विळख्यात घेतले. तर कोरोनाचे दिवसभरात १३३ नव्या बाधित आढळल्याने प्रशासनही हादरले.

omicron With corona of the crisis
नाशिक महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी पेसो परवाना

जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (ता.३) चार रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात १० ओमिक्रॉन बाधित झाले. सहा वर्षांचा चिमुकला ओमिक्रॉनच्या विळख्यात सापडल्याने भीती वाढली आहे. ओमिक्रॉन बाधितांमध्ये दोघे तरुण दुबई रिटर्न आहेत. एक महिला लंडनहून परतलेली आहे. नागपुरात पहिला ओमिक्रॉनबाधित १२ डिसेंबरला २०२१ रोजी आढळला होता. चार ओमिक्रॉनबाधितांमध्ये सतरंजीपुरा झोनमधील ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. लंडनहून १७ डिसेंबरला विमानाने दिल्ली विमानतळावर पोहोचली. कोविडचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे त्याच दिवशी विमानाने नागपूरला पोहोचली. काही तासांपूर्वीच चाचणी झाली असल्याने नागपुरात चाचणी केली नाही. गृहविलगीकरणात महिला होती. दुसऱ्यांदा २३ डिसेंबरला आरटीपीसीआर केल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे २४ डिसेंबरला प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले.

omicron With corona of the crisis
अकोला : मनपा क्षेत्रात ५०० फुटापर्यंत करमाफीचा ठराव घ्या!

खबरदारीचा उपाय म्हणून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे नमुने पाठवले. ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे सोमवारी (ता.३) स्पष्ट झाले. २६ डिसेंबरला दुबईतून परतलेल्या दोन तरुणांना कोरोनाची बाधा झाली. ओमिक्रॉन तपासणीसाठी जिनोम सिक्वेंसिग केले. त्यात हे दोघीहा बाधित आढळले. यातील एक चंद्रपुरातील नागभीड येथील ३६ वर्षीय तरुण तर गोंदियाच्या तिरोडा येथील २८ वर्षीय तरुणाचा ओमिक्रॉनबाधित समावेश आहे. दुबईतील शारजा येथून थेट विमानाने ते २६ डिसेंबरला नागपूर विमानतळावर पोहोचले होते.

कोरोनाचे सक्रिय सव्वापाचशे पार

सोमवारी १३३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात तिसरी लाट आल्याचे संकेत आहेत. मे २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली. जूननंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. जुलैमध्ये रुग्णसंख्या तीसच्या खाली आली होती. यापूर्वी ७ जून २०२१ रोजी म्हणजेच दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात १३४ बाधितांची नोंद झाली होती. त्यात शहरातील ५४, ग्रामीणमध्ये ७७ असे बाधित होते. सोमवारी (ता.३) २०२२ रोजी जवळपास पावणेसात महिन्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने उच्चांकी गाठली. सोमवारी जिल्ह्यात ५ हजार ४०९ चाचण्या झाल्या. यात शहरातून १०५, ग्रामीणमधून २० व जिल्ह्याबाहेरील ८ अशा १३३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. सध्या शहरात ४४८, ग्रामीणमध्ये ४५ व जिल्ह्याबाहेरील ३३ असे तब्बल ५२६ वर सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

omicron With corona of the crisis
कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; निवडणुकीत काँग्रेस बनला सर्वात मोठा पक्ष

ओमिक्रॉन रुग्णांबाबत हयगय

२० डिसेंबर २०२१ रोजी युगांडा येथून परतलेल्या माय-लेकाची नागपूरच्या विमानतळावर चाचणी केली. त्यात महिलेसह ६ वर्षीय मुलाचा अहवाल कोरोनाबाधित आला. यांचे नागपुरात घर आहे. महापालिकेने नागपुरातच गृहविलगीकरणात राहण्याची सक्ती करण्याची गरज होती. परंतु अहवाल सकारात्मक आल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय पथक नागपुरातील घरी धडकले. परंतु माय-लेक अमरावती येथील घरी निघून गेले होते. दरम्यान त्यांच्या अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितल्यानंतर ते अमरावती येथील रुग्णालयात भरती झाले. ओमिक्रॉनच्या जिनोम सिक्वेंसिंगकरिता पुण्याच्या प्रयोगशाळेकडे नमुने पाठवले असता, ६ वर्षीय मुलाचा अहवाल ओमिक्रॉनबाधित आढळला. तर मातेचा अहवाल प्रतीक्षेत आहे. नागपुरात विलगीकरणात मायलेक असते, तर इतरांच्या संपर्कात हे आले नसते, असा हलगर्जीपणा कोरोना तसेच ओमिक्रॉनच्या वाढीस कारणीभूत ठऱत असल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.

omicron With corona of the crisis
PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण

तारीख - ओमिक्रॉनबाधित

  • १२ डिसेंबर२०२१ - पहिला ओमिक्रॉनबाधित

  • २३ डिसेंबर - दुसरा ओमिक्रॉनबाधित

  • २७ डिसेंबर - तिसरा ओमिक्रॉनबाधित

  • २९ डिसेंबर - तीन जण ओमिक्रॉनबाधित

  • ३ जानेवारी २०२२ - चार जण ओमिक्रॉनबाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.