इथे सरपंचपदासाठी नव्हे तर उपसरपंचपदाची आहे चर्चा; कारणही आहे तसे हटके

One man show in the political connection of Sarpanch election Nagpur rural news
One man show in the political connection of Sarpanch election Nagpur rural news
Updated on

खापरखेडा (जि. नागपूर) : नुकत्याच झालेल्या पोटा (चनकापूर) ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सरपंच निवडित ‘वन मॅन शो’ असल्याचे चित्र समोर आले आहे.

पोटा (चनकापूर) ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. येथे एकूण १७ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक लढविण्यात आली होती. पोटा (चनकापूर) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत ग्रामविकास आघाडीचे एकूण ९ सदस्य निवडून आले. भाजप, शिवसेना, रिपाइं समर्थित नगर विकास परिवर्तन आघाडीचे एकूण ७ सदस्य निवडून आले आहेत.

एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. पोटा ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडले. केदार गटाचे अनुसूचित जमाती प्रवर्गातील अवघ्या २४ वर्षीय वयाचे सदस्य पवन धुर्वे फक्त सहा मतांनी निवडून आले आहेत. नव्याने निघालेल्या पोटा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग असून, सरपंचपदांची निवडणूक आगामी ११ तारखेला होणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गाचा उमेदवार हा केदार गटातून निवडून आल्याने सरपंचपदाच्या निवडित निश्र्चित असून, बिनविरोध सरपंचपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली असल्याचे बोलले जाते. आगामी क्षणातच काही दिवसांत ती पूर्ण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र, उपसरपंचपदासाठी उत्सुक सदस्यांची आपली वर्णी लागावी, यासाठी काही सदस्य प्रयत्नशील आहेत.

केदार गटाचाच बिनविरोध सरपंच होणार!

एकीकडे भाजप शिवसेना समर्पित गटातील सदस्य मंडळींना बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज असून, जुळवाजुळवीचे राजकारण शिगेला पोहोचले. पण, त्यांच्याकडे आरक्षणातील सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती खुला प्रवर्गाचा सदस्य नसल्याने केदार गटाचाच बिनविरोध सरपंच होणार, अशी राजकीय चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.