नागपूर जिल्ह्यात तयार होतात एक मिलियन मातीच्या मूर्ती

नागपूर शहर व जिल्ह्यातील चार हजार मूर्तिकार
One million clay idols are produced in Nagpur district
One million clay idols are produced in Nagpur district
Updated on

नागपूर - कोरोनाचे संकट टळल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला गणेशोत्सव जवळ आला आहे. गणेशोत्सव धडाक्यात साजरा करण्यात आणि मूर्ती तयार करण्यासाठी नागपूरची ख्याती आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील चार हजार मूर्तिकार सुमारे एक मिलियन (दहा लाख) मातीच्या मूर्ती तयार करीत असल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये, घरगुती, सार्वजनिक आणि निर्यात केल्या जाणाऱ्या मूर्तीचा समावेश आहे. संपूर्ण देशभरामध्ये या मातीच्या मूर्तीचा पुरवठा होत असल्याने मातीची मूर्ती तयार करणारे शहर म्हणून नागपूरची ओळख होऊ लागली आहे.

शहरामध्ये घरगुती गणपतीची मूर्ती बनविणारे जवळपास ६५० मूर्तिकार असून ३.५० लाख मूर्ती ते तयार करतात. जिल्ह्यामधील १३ तालुक्यातील ३ हजार २५० मूर्तिकार ६.५० लाख मूर्ती तयार करतात. सार्वजनिक गणपती मूर्तीची संख्या २ हजार ५०० पेक्षा अधिक आहे. यावरून होणारी उलाढाल लक्षात येते. विशेष म्हणजे संपूर्ण १० लाख गणपती हे निव्वळ मातीपासून तयार केले जातात. यासाठी विदर्भातील आंधळगाव (ता. मोहाडी, जि. भंडारा), सावरगाव (ता. नरखेड, जि. नागपूर), सिंदेवाही (जि. चंद्रपूर), कोळंबी (ता. पवनी, जि. भंडारा) आदी गावांमधून माती आयात केली जाते. मूर्तिकार आणि मूर्तीची संख्या बघता तेरा हजार टनपेक्षा जास्त मातीची आयात या गावांमधून होते. मूर्ती बनविण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून माती आयात केली जाते. त्यानंतर, ती गाळणे, पाण्याचे मिश्रण करून त्यातील खडे नाहीसे करणे आणि ओली झालेली माती पसरवून त्याला वाळविल्या जाते. यासाठी मूर्तीकारांना चार दिवसांचा अवधी लागतो.

उत्तर प्रदेशच्या आझमगडची माती स्वस्त

शहरातील चार मूर्तीकारांनी यंदा मातीच्या बाबतीत नवा प्रयोग केला आहे. नऊशे किलोमीटरवरील उत्तर प्रदेशातील आझमगड येथून त्यांनी मूर्तीसाठी उत्कृष्ट असलेली ३२ टन माती आयात केली. विशेष म्हणजे मोठा प्रवास करून आणलेली माती विदर्भातील मातीच्या तुलनेत स्वस्त मिळाली. या मातीवर आवश्‍यक प्रक्रिया देखील करावी लागणार नसल्याने मूर्ती तयार करण्याचा कालावधी देखील कमी होणार आहे.

मूर्तिकार संख्या माती (टनमध्ये) मूर्ती

शहर ६५० २ हजार ६०० ३ लाख ५० हजार

जिल्हा ३ हजार २५० ६ हजार ५०० ६ लाख ५० हजार

सार्वजनिक २ हजार ४ हजार २ हजार ५००

एकूण १३ हजार १०० १० लाख अडीच हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.